रब्बी हंगामापासून ई-पीक नोंदणी मोबाईल ॲपद्वारे
*🛑रब्बी हंगामापासून ई-पीक नोंदणी मोबाईल ॲपद्वारे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- :-२९* : रब्बी हंगाम २०२४ पासून पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे आता DCS मोबाईल अॅ पद्वारे पीक नोंदणी करण्यात येणार आहे, असे महसूल खात्याने जाहीर केले आहे. शेतकऱ्यांनी या अॅपवर रब्बी हंगाम पिकाच्या नोंदणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) मध्ये केंद्राच्या निर्देशाप्रमाणे १०० टक्के नोंदीचे फोटो घेणे आवश्यक आहे. त्यानुसार सुधारित तीन तरतुदी तयार करण्यात आल्या आहेत.
त्या अशा : १. गाव नमूना १२ मध्ये पीक जाहीर केल्यानंतर जर पीक, क्षेत्र, जल सिंचनाचे साधन, पड जमिनीबाबत किंवा शेरा स्तंभातील माहिती (गा. न. १२, स्तंभ २ आणि ४ ते ११) चुकीची जाहीर झाल्याचे निर्देशास आल्यास किंवा संबंधित खातेदाराने अशी चुक दुरुस्त करण्यासाठी अर्ज दिल्यास किंवा अशा चुकीबाबत कोणताही आक्षेप प्राप्त झाल्यास, ग्राम महसूल अधिकारी हा अर्ज आवक-जावक नोंदवहीमध्ये नोंदवून मंडळ अधिकारी यांच्याकडे अग्रेषित करतील. २. मंडळ अधिकारी यांची पीक दुरुस्तीची खात्री पटल्यास मंडळ अधिकारी स्थळ निरीक्षण व ऑफलाईन पंचनामा करतील व मोबाईल अॅपमध्ये सत्यापनकर्ता लॉगिनने पीक दुरुस्त करतील. सोबतच जमिनीत दुरुस्तीची मागणी केलेली बाब पीक किंवा पड क्षेत्र असल्यास, डिजिटल क्रॉप सर्व्हे अॅपद्वारे फोटो काढून अपलोड करतील व शेरा स्तंभात पीक नोंदीत दुरुस्ती केली, असे नमूद करतील.३. नोंदी चुकीच्या पद्धतीने करून संबंधित खातेदाराने जर कोणत्याही शासकीय सहाय्य योजनांचा फायदा घेतला असल्याचे सिद्ध झाल्यास, मंडळ अधिकारी या दुरुस्तीची बाब, संबंधित सहाय्य यंत्रणेस तात्काळ कळवतील. ही दुरुस्ती फक्त हंगाम कालावधीत व त्यापुढील १५ दिवसांत करता येईल.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

