सावंतवाडी जिमखाना मैदान खेळण्यास योग्य करुन द्या अन्यथा शहरातील सर्व क्रिकेट प्रेमी व युवा खेळाडूंसह मोर्चा काढणार -परीमल नाईक
*🛑सावंतवाडी जिमखाना मैदान खेळण्यास योग्य करुन द्या अन्यथा शहरातील सर्व क्रिकेट प्रेमी व युवा खेळाडूंसह मोर्चा काढणार -परीमल नाईक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२९:-* शहरातील जिमखाना मैदान हॆ एतिहासिक मैदान असून या मैदानाने असंख्य क्रिकेट पटू घडवले. जगप्रसिद्ध व क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर सह विनोद कांबळी, प्रवीण आमरे,समीर दिघे ई. यांच्या सारखे नामांकित खेळाडूंनी या मैदानावर कै. द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे घेतले. भारताच्या टीममधील अनेक नामवंत खेळाडू या मैदानावर खेळून गेले. सावंतवाडी व परिसरातील अनेक टॅलेंटेड क्रिकेट पटू या मैदानावर सरावासाठी इच्छुक असुन ते प्रतीक्षेत आहेत.सरावासाठी व मॅचेस साठी इतरत्रमैदान उपलब्ध सुद्धा नाही. डिसेंबर महिना समीप आला तरी मैदानाची परिस्थिती अतिशय गंभिर असुन वेळोवेळी विनंती वजा मागणी करून सुद्धा परिस्थिती “जैसे थे ”आहे.
प्रशासनाची अनास्था, बेजबाबदार पणा व असंवेदनशीलता या बाबी अतिशय चिंताजनक आहेत अशी टीका माजी नगरसेवक परीमल नाईक यांनी केली आहे.
. सदर मैदानावर देखभाली करिता लाखो रुपये खर्च केले जातात व त्या खर्चाचा प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रित्या सहजासहजी अपव्यय होत असुन जनतेच्या पैशाची पायमल्ली करण्यासारखा हा प्रकार आहे. नगरपरिषद प्रसासन खाजगी कार्यक्रमांना जिमखाना मैदान भाडयाने देऊन सुद्धा सदर मैदानाची अवस्था दैनंनीय करत असते. प्रशासनाने भविष्यात खाजगी प्रयोजनासाठी मैदान भाड्याने देऊन दुरावस्था केल्यास व येत्या पंधरा दिवसात जिमखाना मैदान सुस्थितीत उपलब्ध करून न दिल्यास शहरातील सर्व क्रिकेट प्रेमीसह युवावर्ग यांच्या समवेत नगरपरिषदेवर नागरी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा क्रीडा प्रेमी तथा माजी क्रीडा सभापती अँड. परिमल नाईक यांनी दिला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

