युवकाला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण
*🛑युवकाला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२९:-* येथील हॉटेल पॉम्पससमोरील रस्त्यावर दहा ते पंधरा जणांच्या युवकांच्या जमावाने एकाला बेदम मारहाण केली. मारहाणीची घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रॉयस्टन जॉन डिसोजा (१७) असे जखमी युवकाचे नाव असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्या आईने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संशयित उज्वल दापले व तुषार तुळसकर याच्यासह दहा ते पंधराजणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी युवकाने वादातून संशयित उज्वल दापले याला शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यावर पडदा टाकण्यात आला होता. मात्र, ही बाब दापले याच्या मित्रांना समजताच त्यांनी युवकाला हॉटेल पॉम्पससमोरील रस्त्यावर बोलावून घेतले. ‘शिवीगाळ का केलीस?’, अशी विचारणा करत उज्वल दापले व तुषार तुळसकर यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अन्य दहा ते पंधरा जणांनी हाताच्या थापटाने व रस्त्यावर खौली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमी अवस्थेत युवकाने मारहाणीची कल्पना भावाला दिली. त्याने घटनास्थळी धाव घेत त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी जखमी युवक व त्याच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मुख्य संशयित दोघांसह दहा ते पंधराजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

