संविधान सप्ताहाचे २ डिसेंबरपर्यंत आयोजन
*🛑संविधान सप्ताहाचे २ डिसेंबरपर्यंत आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२८:-* भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने समाजकल्याण विभागांतर्गत २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ या कालावधीत संविधान सप्ताहाचे आयोजन करून संविधान दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे सहाय्यक लेखाधिकारी उदय यादव यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, विविध महामंडळे व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग या कार्यालयातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये तसेच अधिनस्त शासकीय वसतिगृहे, शाळा महाविद्यालयांमध्ये संविधान उद्देशिका दर्शनी भागात लावून संविधान रॅली काढण्याचे गृहपाल, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना सूचित करण्यात आले आहे. संविधानातील माहिती मार्गदर्शन करणे, पथनाट्य सादर करणे, संविधानातील प्रमुख प्रकरणे हक्क आणि कर्तव्ये यावर मार्गदर्शन करणे, प्रश्नमंजुषा सादरीकरण करणे तसेच जिल्हास्तरावर शाळा-महाविद्यालये येथे संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण, वादविवाद चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या५ सप्ताहामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

