चिपळूण नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात सोयी-सुविधांचा अभाव; जनावरांचे होतायेत हाल
▪️प्रशासनाने लक्ष द्यावे; युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी*
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.२१: येथील नगर परिषदेच्या कोंडवाड्यात सोयी सुविधांचा अभाव असल्याने जनावरांची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी येथील जनावरांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष फैसल पिलपिले व तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले यांनी केली आहे.
चिपळूण शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांसाठी येथील नगर परिषदेने कोंडवाड्याची व्यवस्था केली आहे. या कोंडवाड्यात मोकाट जनावरांना ठेवले जात आहे. मात्र, येथे असलेल्या जनावरांची तितकीशी व्यवस्था ठेवली जात नसल्याने जनावरांचे हाल होत आहेत. याची माहिती मिळताच युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष फैसल पिलपिले, तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले यांनी कोंडवाड्याकडे धाव घेत पाहणी केली. यावेळी तेथील परिस्थिती बघितल्यानंतर युवक कार्यकर्ते अचंबित झाले. या जनावरांच्या चाऱ्याची तितकीशी व्यवस्था नसल्याने जनावरांचे हाल होत असल्याचे या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार संताप व्यक्त करणारा होता.
कोंडवाड्यामधील सोयी सुविधांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात आले. या प्रकाराची प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी या युवा कार्यकर्त्यांनी केली आहे.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_