कणकवलीत महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्याबाबत फक्त चर्चा; ठोस कार्यवाही नाही
▪️येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत तरी महाराजांचा पुतळा पुनर्स्थापित व्हावा; मराठा समाजाची मागणी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२१: शहरात महामार्ग चौपदरीकरण विस्थापित होत आहे. यातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थलांतरित करण्याबाबत अनेकदा चर्चा झाली. मात्र त्याबाबत आतापर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नाही. याप्रश्नी आमदार, खासदार, मंत्री यांनी पाहणी केली. आश्वासने दिली. मात्र, त्याबाबत ठोस कोणतीच कार्यवाही झालेली नाही. येत्या फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असुन त्यापुर्वी हा प्रश्न मार्गी लागावा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुनर्स्थापित व्हावा, अशी मराठा समाजाची भुमिका व मागणी असल्याची माहिती मराठा समाजाचे नेते एस.टी. सावंत यांनी दिली.
मराठा मंडळ सभागृहात पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत लवु वारंग, भाई परब, बच्चु प्रभुगावकर , सुशील सावंत, सखाराम सपकाळ, अविनाश राणे, यश सावंत आदी उपस्थित होते. सावंत पुढे म्हणाले, अखंड जगभरात ज्यांचा आदर्श घेतला जातो, ज्यांना राष्ट्रपुरुष मानले जाते. अशा छत्रपतींचा पुतळा चौपदरीकरणात धुळखात उड्डाणपुलाखाली असल्याची बाब खेदजनक आहे. याबाबत राजकीय लोकांकडुन वेगवेगळ्या जागा सुचवण्यात आल्या. एकमेकांनी सुचवलेल्या जागांना विरोधही झाला. त्यामुळे आजपर्यंत हा प्रश्न प्रलंबितच राहिला. याप्रश्नी सर्वांनी एकमत करत छत्रपतींच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित करण्याची गरज आहे. कणकवली शहराच्या लौकिकाला शोभेल असा निर्णय आपण सर्वांनी एकत्रित येऊन घेतला पाहिजे. आमदार, खासदार व मंत्री यांनी पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली. मात्र त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आज पुन्हा एकदा मागणी करावी लागली. गेली तीन वर्षे हा प्रश्न प्रलंबित असताना याबाबत ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे या प्रश्नी आता मराठा समाज पुढाकार घेत असुन, येत्या २६ जानेवारी रोजी आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी व कणकवलीतील प्रतिष्ठित नागरिक यांना एकत्रित आणत. यासंदर्भात एकमत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती एस.टी. सावंत यांनी दिली.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_