करियरकोकणरत्नागिरीसामाजिक

मृणाल काशीकर-खडक्कर यांच्या ‘तुझी माझी गोष्ट’ पुस्तकाचे २३ जानेवारीला प्रकाशन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.२१: रोजच्या जगण्यातील तोच-तोचपणा आणि नकारात्मकता यांना आपण कंटाळून जातो. आयुष्यातली तीच तीच नाती आणि त्यांची तीच तीच वळणं घेताना कधी कधी निसटून गेलेली नाती, आठवणी, आठवणींचा सुगंध मनावर कोरलेला असतो . अशाच तरल, मनाला भिडणाऱ्या आणि आपल्या आठवणी जागृत करणाऱ्या काही गोष्टींचा संग्रह म्हणजे मृणाल काशीकर-खडक्कर हिचे आगामी पुस्तक ‘तुझी माझी गोष्ट!’ सुनिधी पब्लिशर्स पुणे, यांनी प्रकाशित केलेल्या या ‘ तुझी माझी गोष्ट ‘ पुस्तकाचे प्रकाशन २३ जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे . मृणाल काशीकर-खडक्कर ही चिपळूणच्या डी.बी.जे. कॉलेजचे माजी प्राध्यापक काशीकर सर व मॅडम यांची सुकन्या असून युनायटेड इंग्लिश स्कूल आणि डी.बी.जे. कॉलेजची माजी विद्यार्थिनी आहे . वकिली बरोबरच व्यवस्थापनाचीही मास्टर्स घेऊन सलग दहा बारा वर्षं अध्यापन केल्यानंतर मृणाल आता मुक्त लेखन आणि अनुवाद करत आहे . वर्तमानपत्रात आणि मासिकात अनेक कॉलम, मासिकांसाठी मुलाखती, तसेच ‘द पर्सनल एमबीए’, ‘सेक्रेड गेम्स’ सारख्या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद तिने केला आहे . तिच्या अनेक कथांपैकी काही निवडक ललितबंधाकडे झुकणाऱ्या कथा आपल्याला ‘ तुझी माझी गोष्ट ‘ या पुस्तकात संकलित स्वरुपात वाचायला मिळणार आहेत . सध्या याच बरोबर ती वेबसिरीज आणि सिनेमाध्यामासाठी सहाय्यक पटकथालेखन देखील करत आहे.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!