आणखीकोकणक्राइमदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑 गोवा बनावटीची दारू वाहतुकी प्रकरणी दोडामार्ग पोलिसांची कारवाई

🛑 आठ लाख दहा हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२२:- बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू वाहतुकी प्रकरणी विजघर चेकपोस्ट येथे दोडामार्ग पोलीसांनी कारवाई करत ८ लाख रुपये किमतीचा कॅन्टर व १० हजार ८०० रुपयांची गोवा बनावटीची दारू असा एकूण ८ लाख १० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी विनोद धर्माप्पा दोडमणी (३५, रा. शिरूर, बागलकोट कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वीजघर चेकपोस्टवर पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. गोव्यातून बेळगावच्या दिशेने येणारा कॅन्टर (केए ६३ – ७६३८) तपासणीसाठी थांबविण्यात आला. कॅन्टरच्या मागील हौद्यात तीन कागदी पुठ्ठयाचे दारूचे बॉक्स आढळून आलेत. चालकाकडे गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीचा परवाना नसल्याने सदर दारू व दारू वाहतुकीसाठी वापरलेला कॅन्टर पोलिसांनी जप्त केला. दारूची किंमत बाजारभावाप्रमाणे १० हजार ८०० रुपये आहे.

सदर कारवाई पोलीस नाईक राजेश गवस, सर्वेक्षण स्थिर पथक प्रमुख रवींद्र चव्हाण पाणीपुरवठा विभागाचे दशरथ शिंदे, होमगार्ड अनिकेत गवस, कॅमेरामन आका वाघेला यांच्या पथकाने केली.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!