जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांचे झोपण्या-बसण्याचे होणारे हाल पाहून सामाजिक बांधिलकीच्या रुपा मुद्राळे देणार टेबल्स, ब्लॅंकेट्स व चटया.

*🛑जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांचे झोपण्या-बसण्याचे होणारे हाल पाहून सामाजिक बांधिलकीच्या रुपा मुद्राळे देणार टेबल्स, ब्लॅंकेट्स व चटया.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१९:-* सामाजिक बांधिलकीच्या रुपा मुद्राळे ओरोस येथे शासकीय योजनेतून आईच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आईला घेऊन गेली असता, तेथे दोन दिवस तिच्या आईला इतर अनेक रुग्णांसोबत ऍडमिट करुन ठेवण्यात आले. मात्र दोन दिवसांनी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत परत पाठवण्यात आले. जिल्हा रुग्णालयात गावागावातून रुग्ण येतात. मात्र येथे पेंशटच्या नातेवाईकांना बसण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे रस्त्यावर बसावे लागते, तसेच पेशंटना ब्लँटेस नसल्याचे अत्यंत हाल होत असल्याचे रुपा मुद्राळे यांना दिसून आले. त्यामुळे तिने तिथूनच सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे व रवी जाधव यांच्याशी फोनवर चर्चा करून येत्या दोन दिवसात आपण काही करून येथील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 20 टेबल, 20 ब्लॅंकेट व 20 चटया देण्याचे निश्चित केले आहे. सावंतवाडी येथे सोमवार लाईट नसल्यामुळे व उपजिल्हा रुग्णालयातील जनरेटर सतत बंद पडत असल्यामुळे येथे गावागावातून येणा-या रुग्णांना खूप हाल सहन करावे लागतात. याचा अनुभव रूपा मुद्राळे व रवि जाधव यांना नेहमीच घ्यावा लागतो रुग्णांच्या सेवेसाठी रूपा मुद्राळे व रवी जाधव हे वारंवार हॉस्पिटलच्या संपर्कात त्यामुळे हॉस्पिटल मधील सर्व परिस्थिती त्यांना माहित आहे लाईट गेल्यानंतर अपघात विभाग व अति दक्षता विभागामध्ये पेशंटला धोका निर्माण होऊ नये यासाठी उपजिल्हा रुग्णालयात इन्व्हर्टर बसविण्यासाठी आवश्यक असलेल्या रक्कम रु.35,000/- मात्र पैकी रुपा मुद्राळे यांनी त्यांच्या आईच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी ठेवलेले रक्कम रु.15,000/- देण्याचे ठरविले आहे. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आजपर्यंत सुमारे दीड लाख रुपयांच्या वस्तू दानशूर व्यक्ती यांच्या सहाय्याने रुग्णांच्या सेवेसाठी देण्यात आल्या याचे कारण शासकीय रुग्णालय म्हटलं की येथे गोरगरीबच रुग्ण येतात व त्या रुग्णांना योग्य सोयी सुविधा मिळाव्या त्यांचे हाल होऊ नयेत यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान नेहमी झटत असते व रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करत असते. संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी रूपा मुद्राळे यांच्या या निर्णयाचे कौतुक करून आपण पण या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊया असे सदस्यांना आवाहन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!