कुडाळ मालवणातील रस्ते निधीवर ‘डाका’ घालणारा ‘राजेश डाके’ आणि त्यांचे मीत्र आमदार वैभव नाईक यांच्या पार्टनरशीपच्या चर्चेचे गौडबंगाल काय?

*🛑कुडाळ मालवणातील रस्ते निधीवर ‘डाका’ घालणारा ‘राजेश डाके’ आणि त्यांचे मीत्र आमदार वैभव नाईक यांच्या पार्टनरशीपच्या चर्चेचे गौडबंगाल काय?*

*🛑फक्त कुडाळ मालवणच नव्हे तर सावंतवाडीच्या गवळी नाका ते आंबोली रस्त्याची वाट या डाके मुळेच लागली*

*🛑बांधकाम खात्याचे अधिकारी सांगतात आमदारांचा मीत्र तो म्हणून कारवाई होत नाही*

*🛑कुडाळ मालवण बरोबरच सावंतवाडी मतदारसंघातील खराब रस्ते डाकेंचेच कर्तृत्व*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१६:-* कुडाळ व मालवण व सावंतवाडी तालुक्यातील अनेक बोगस रस्त्यांच्या विषयात एक नाव तुम्ही ऐकलं असेल ते नाव म्हणजे राजेश डाके आता सिंधुदुर्गात हे ‘डाके’ आले कुठून याचा शोध घेतल्यानंतर समजलं की हे राजेश डाके आमदार वैभव नाईक यांचे जवळचे मित्र असून ते कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.आता वैभव नाईक यांच कोल्हापूर कनेक्शन काय? तर वैभव नाईक यांच बारावी नंतरच शिक्षण कोल्हापुरात झालं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यपीठातून नेमके त्याच वेळी सिव्हिल इंजिनिअर असलेले राजेश डाके वैभव नाईक यांच्या संपर्कात आले. कोल्हापूर जिल्ह्यात छोटीमोठी कामे करणारे डाके पुढे वैभव नाईक आमदार झाल्यावर सिंधुदुर्गात अवतीर्ण झाले. आमदार नाईक यांच्या आशीर्वादाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका गावात त्यांनी स्वतःचा क्रशरही सूर केला. वैभव नाईक यांची सिमेंटपाईप कंपनी डाकेचा क्रशर डांबरप्लांट याच्या जीवावर आमदारकीचा वापर करत नाईक आणि डाके यांनी सिंधुदुर्गात ठेकेदारी सुरू केली ज्याच्या माध्यमातून गेली दहा वर्ष मतदारसंघातील रस्त्यांचा निधी गायब करण्याच काम सुरू आहे. आणि म्हणूनच कोट्यवधी खर्च करूनही कुडाळ मालवण मधील एकही रस्ता सुस्थितीत नाही. अगदी तशीच अवस्था सावंतवाडी ते आंबोली रस्त्याची आहे या डाके महाशयांनी एप्रिल मध्ये केलेला रस्ता पहिल्याच पावसात जून मध्ये वाहून गेला व यांचे पितळ उघडे पडले,आम्ही याबाबत वारंवार उठाव केला,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उठाव केला परंतू ठेकेदारावर कारवाई होत नव्हती आम्ही त्यावेळी चौकशी केली या डाका घालणाऱ्या डाकेला वरदहस्त कोणाचा त्यावेळी समजले आमदार वैभव नाईक यांचा दबाव आहे.
तसे पाहायला गेले तर आमदार वैभव नाईक यांनी दहा वर्षात प्रत्येक वेळी चुकीच्या कामांचे समर्थन केले, एखाद्या चुकीच्या घटनेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केले नाही,तर गोरक्षक संघटनेची अनेक मुले आजरा येथे कत्तली साठी जाणाऱ्या गायींना रात्री बे रात्री रस्त्यावर थांबून गाईंचे प्राण वाचवतात व हे गायींची तस्करी करणारे बहुतांशी नराधम, आमदार वैभव नाईक यांचेच कार्यकर्ते असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले व त्यावर शिक्कामोर्तब झाले ते वैभव नाईक यांनी विधानसभेत शेतकरी आपल्या गुरांना विक्रिसाठी सावंतवाडी आंबोली मार्गे कोल्हापूर येथे नेत असतात तेव्हा त्यांची वाटेत अडवणूक केली जाते ती अडवणूक होऊ नये अशा सूचना द्याव्यात अशी मागणी व विधानसभेत केली होती यावरून ही मागणी नेमकी कोणासाठी केली हे सिद्ध झाले होते.
आम्हीही शेतकरी आहोत त्यामुळे आमच्या जवळ दिवसाला दोन लीटर,दीड लिटर दुध देणाऱ्या भाकड गायींना बैलांना,घाटवर का म्हणून विकत घेतले जाईल हे न समजण्या इतपत जनता खुळी नाही,वेभव नाईक आपण आमदार नंतर पहिले हिंदू आहात याचे भान ही मागणी करताना भान ठेवायला हवे होते स्वार्थासाठी कोण कीती लाचार होऊ शकतो याचे हे मुर्ती मंत उदाहरण आहे.
आता वैभव नाईक म्हणतील माझा आणि डाकेंचा काहीही संबंध नाही तर त्यांच्याच मतदारसंघात बोगस काम करणारे कोल्हापूरचे ठेकेदार कसे अवतीर्ण झाले याच उत्तर आमदार नाईक देतील का? सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने सिव्हिल इंजिनिअर आहेत. त्यात क्लास वन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असलेल्यांची संख्याही मोठी आहे मग बाहेरच्या जिल्ह्यातील ठेकेदारच यांना का लागतात याचही उत्तर आमदार नाईक आणि त्यांच्या सनर्थकांनी द्यावं.
व्यवसायाने ठेकेदार असेलेले आमदार वैभव नाईक जे कुडाळ मालवण मधील रस्ते टक्केवारी किंवा पार्टनरशिप मध्ये परजिल्ह्यातील ठेकेदारांना देऊन कोणाच्या तुंबड्या भरत आहेत.जिल्ह्यातील ठेकेदारांना ते या रस्त्यांची काम देण्याच्या लायकीचे समजत नाहीत काय याचे उत्तरही त्यांना द्यावे लागेल.लोकप्रतिनिधी जर स्वतःचा आर्थिक फायदा डोळ्यासमोर ठेवून निधीच्या घोषणा करत असततील तर यांची आमदारकी ही जनतेसाठी नसून यांच्या व्यवसायवाढीसाठी आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं.
आपण कुठेच भ्रष्टाचार केला नाही असं वैभव नाईक म्हणतात मग पांग्रड कुंभ्याचीवाडी, आंदुर्ले-पाट रस्ता, जांभवडे वाघबीळ हे रस्ते एका वर्षात वाहून गेले त्याला जबाबदार कोण? आणि तुम्ही स्वतः निष्ठावंत प्रामाणिक आमदार मग तुम्ही आमदार असताना जेव्हा मतदारसंघाला चुना लावला जात होता तेव्हा तुम्ही नक्की कुठल्या भूमिकेत होता हे एकदा स्पष्ट करा
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!