करियरक्रीडासामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत 31 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.21: मुक्ताई बुद्धिबळ व कॅरम ॲकेडमी, सावंतवाडी आणि श्री चेस ॲकेडमी, कणकवली यांच्या संयुक्त विदयमाने प्रजासत्ताक दिन निमित्त पहिली सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सावंतवाडीतील श्री.पंचम खेमराज महाविद्यालय हाॅल येथे रविवार दि.31 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येणार आहे. कोविड कालावधीतील सर्व नियमांचे पालन करुन स्पर्धा खेळविण्यात येईल.

स्पर्धेचे उदघाटन युवराज श्रीमंत लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रीमंत श्रदधाराजे भोंसले यांच्या शुभहस्ते आणि प्रांत अधिकारी सुशांत खांडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.रोहीणी सोळंके, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक श्री.सुर्यकांत पेडणेकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 9.30 वाजता करण्यात येणार आहे.

स्पर्धेत खुल्या गटात प्रथम रु.1500 व चषक, द्वितीय रु.1000 व चषक, तृतीय रु.700 व मेडल, चौथा रु.500 व मेडल, पाचवा रु.300 व मेडल आणि 20 वर्षांखालील विदयार्थी गटात प्रथम रु.200 व मेडल, द्वितीय रु.100 व मेडल, तृतीय मेडल आणि 13 वर्षांखालील विदयार्थी गटात प्रथम रु.200 व मेडल,द्वितीय रु.100 व मेडल, तृतीय मेडल आणि 20 वर्षांखालील विदयार्थिनी गटात प्रथम रु.200 व मेडल, द्वितीय रु.100 व मेडल, तृतीय मेडल अशी चार गटांमध्ये एकूण चौदा पारितोषिके देण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रं देण्यात येणार आहे.

स्पर्धा भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या नियमांनुसार एकत्र स्विस लीग राउंड्स पदधतीने खेळविण्यात येईल. स्पर्धकांच्या संख्येवर राउंड्स आणि वेळ ठरविण्यात येईल. नाव नोंदणीची अंतिम तारीख शनिवार दि.30 जानेवारी आहे. अधिक माहीतीसाठी 8007382783 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मुक्ताई अॅकेडमीचे संचालक श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि श्री चेस अॅकेडमीचे संचालक श्री.श्रीकृष्ण आडेलकर यांनी केले आहे.

_*💥कोलगावात दुमदुमणार डबलबारी भजनाचा जंगी सामना..💥*_

_🙏🏻नमस्कार! भजन रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री देव कलेश्वर,श्री देव गजानन,श्री देवी सातेरी यांच्या कृपाशीर्वादाने..✋🏻_

_💫ओंकार संगीत विद्यालय व ओंकार प्रसादिक भजन मंडळ कोलगाव आणि ग्रामस्थ, मित्रमंडळ कोलगाव आयोजित..⚡_

*🔥२०❌२० डबलबारी भजनाचा जंगी सामना🔥*

*🌈शनिवार दिनांक २३ जानेवारी २०२१ रोजी रात्रौ ठीक ८:०० वाजता 🕗*

*🌐ठिकाण : कोलगाव ग्रामपंचायत शेजारी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.*

_*🔥बुवा श्री. भालचंद्र केळुसकर🚩*_
श्री भूतनाथ प्रसादिक भजन मंडळ, वायरी, तालुका-मालवण, जिल्हा-सिंधुदुर्ग.
_*पखवाज : श्री. दादा परब*_
_*तबला : श्री. विशाल केळुसकर*_

   _*❎❌❎ यांचे विरुद्ध ❎❌❎*_

_*🔥बुवा श्री. संतोष शितकर🚩*_
श्री देवी सोमजाई प्रसादिक भजन मंडळ, ठाणे-दिवा, रायगड-खरसई.
_*पखवाज : श्री. गौरव पिंगुळकर*_
_*तबला : कु. सर्वेश पांचाळ*_

_*🔥भजन रसिकांनी लाभ घ्यावा; सुप्रसिद्ध बुवा श्री. कृष्णा राऊळ यांचे आवाहन🙏🏻*_

*🩸संपर्क ⬇️*
_*📱९४२२५९६९३३*_
_*📱९५४५७९९४६३*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!