कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडीत मतदानासाठी पालिकेच्यावतीने जनजागृती

*🛑सावंतवाडीत मतदानासाठी पालिकेच्यावतीने जनजागृती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१४:-* सावंतवाडी शहरातील नागरिकांनी निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावावा. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती उपक्रम पालिकेच्यावतीने घेण्यात आला. नगर परिषदेमार्फत सेल्फी पॉईंट, हस्ताक्षर मोहीम, रांगोळी प्रदर्शन, मतदान शपथ, आरोग्य विभागाच्या घंटागाडीद्वारे मतदान जागृतीबाबतची गाणी वाजविणे इ. माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदान होण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील युवा मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिमखाना स्विमिंग पूल, बॅडमिंटन हॉल, जिम, शाळा व महाविद्यालये तसेच शिवउद्यान, बोट क्लब, सेल्फी पॉईंट येथे विशेष मोहीम राबविण्यात आली. बुधवारी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बाईक रॅलीस सकाळी ८ वाजता जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिवउद्यान येथून मुख्याधिकारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. रॅलीमध्ये सावंतवाडी नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, रोटरी क्लब, लायन्स क्लब व इतर अशासकीय संस्थांचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध शासकीय कर्मचारी, सुजाण नागरिक व पत्रकार यांनी सहभाग नोंदविला. नंतर जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिवउद्यानासमोरील मोकळ्या जागेत सर्वांना शपथ देण्यात आली. त्यानंतर मानवी साखळीचे आयोजन करून सर्वांनी मतदान करण्याचा संकल्प केला. मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्यामार्फत शहरातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीसाठी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!