एसटी बस वाहकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
*🛑एसटी बस वाहकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार*
*🛑वाहकाला अटक : पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-११:-* एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी ओळख निर्माण करून तिच्या अज्ञानाचा फायदा घेत बसच्या वाहकाने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ वाहकास ताब्यात घेतले. गिरीश अशोक घोरपडे (४०, सध्या रा. दोडामार्ग, मूळ रा. नाशिक) असे संशयित वाहकाचे नाव आहे. पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत वाहकाविरोधात गुन्हा दाखल करून शनिवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित गिरीश घोरपडे हा सावंतवाडी आगारात वाहक म्हणून कार्यरत आहे. तो दोडामार्ग भागातील ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या एसटी बसवर असतो. सावंतवाडी तालुक्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी एक अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनी बसमधून ये-जा करते. वाहक गिरीश घोरपडेने तिच्याशी ओळख निर्माण केली. तिच्या अज्ञानाचा फायदा घेतला. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी गोवा येथील रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरनी तपासणी केली असता मुलीवर अत्याचार घडल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार गोवा पोलिसांनी तपास केला. हा प्रकार सावंतवाडी तालुक्यात घडल्याने गुन्हा गोवा पोलिसांनी शनिवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात वर्ग केला. तात्काळ पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत एसटी बस वाहक गिरीश घोरपडे याला अटक केली. संशयित घोरपडे याने गेल्या दोन महिन्यांपासून सावंतवाडी तालुक्यातील लॉजिंगमध्ये मुलीला नेऊन अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले. तपास महिला पोलीस अधिकारी माधुरी मुळीक करीत आहे. दरम्यान, संशयिताला रविवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

