कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चा गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल यांच्यावतीने घेण्यात आलेल्या भव्य दिव्य गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक सावंतवाडी भटवाडी येथील सतीश सुभेदार, द्वितीय क्रमांक मोहन शांताराम कोरगावकर, सरंबळ कुडाळ तर तृतीय क्रमांक स्वामी नंदकिशोर पेडणेकर, इन्सुली ता. सावंतवाडी हे असून ५ उत्तेजनार्थ क्रमांक देखील काढण्यात आले आहे. यामध्ये मेघनाथ पालव, माडखोल ता. सावंतवाडी,प्रभाकर राणे, साटेली भेडशी ता.दोडामार्ग, सौरभ पोपकर, इन्सुली ता. सावंतवाडी, समस्त घाडीगावकर परिवार ओवळीये ता. मालवण,अनंत धोंडी परब, भोगवे हे आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धेकांचे तसेच विजेत्या स्पर्धेकांचे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे बक्षीस वितरण संदर्भात कळविण्यात येणार आहे.

