कणकवलीकोकणमहाराष्ट्र

बेळणे खुर्द गावातील नुकसानग्रस्त भागाची आ. नितेश राणेंनी केली पाहणी

*🛑बेळणे खुर्द गावातील नुकसानग्रस्त भागाची आ. नितेश राणेंनी केली पाहणी*

*🛑महसुल विभागाच्या अधिका-यांसह , वीज वितरणच्या अधिका-यांना सुचना ; शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-०२:-* कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ झाले. विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाल्याने मोठी पडझड झाली. झालेल्या चक्रीवादळात घरांवर झाडे पडून नुकसान झाले व वीज वितरणच्या पोलांवर देखील झाडे पडुन विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या घटनेची तात्काळ दखल घेवून कणकवलीचे आ. नितेश राणे यांनी बेळणे खुर्द गावातील नुकसान ग्रस्तांची भेट घेवून विचारपुस करत संवाद साधला. आ.नितेश राणे यांनी महसुल विभागाच्या अधिका-यांसह , वीज वितरणच्या अधिका-यांना तात्काळ पंचनामे करा व वीज तातडीने सुरु करा असा सुचना दिल्या. तसेच शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आ. नितेश राणे यांनी नुकसान ग्रस्तांना दिले.
यावेळी संदीप सावंत , भाई आंबेलकर , पंढरी चाळके , राजेंद्र चाळके , प्रथमेश सकपाळ , राजेंद्र तांबे , देवदास करांडे , वैभव चाळके आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बेळणे खुर्द गावातील चक्रीवादळात रामकृष्ण गणपत चाळके – घराचे पत्रे उडाले , दत्ताराम सकपाळ – घरावर झाड पडून पत्रे उडाले , बाळा पवार – गाडीवर झाड कोसळून नुकसान, देवदास करांडे – घरावरचे पत्रे उडाले, श्री.देव महापुरुष मंदीर – पत्राशेडवर झाड पडल्याने मोठे नुकसान तसेच वीजेच्या पोलवर झाडे कोसळून विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. या नुकसान ग्रस्तांची आ. नितेश राणे यांनी भेट घेवून विचारपुस करुन मदतीसाठी प्रशासनाला सुचना केल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!