पिंगुळी-गुढीपूर येथे तरुणाची गळफासाने आत्महत्या
*🛑पिंगुळी-गुढीपूर येथे तरुणाची गळफासाने आत्महत्या*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२९:-* पिंगुळी – गुढीपूर येथील गौरव बियर बारच्यानजीक आंब्याच्या झाडाला समीर राजन घोगळे (३५, मूळ रा. कट्टा हडपेवाडी, सध्या रा. पिंगुळी- गुढीपूर) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी २.४५ वाजता निदर्शनास आली. याबाबतची खबर त्यांचे मेहुणे अमृत अनिल गंगावणे (रा. पिंगुळी गुढीपूर) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. समीर यांने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. समीर घोगळे यांचे घर कट्टा हडपेवाडी येथे असून त्यांची सासरवाड पिंगुळी- गुढीपूर येथे आहे. त्यांना दारूचे व्यसन होते. गेली सहा – सात वर्षे ते गुढीपूर येथे आपली पत्नी व दोन लहान मुलांसह भाड्याने राहत होते. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह चालवत होते. सोमवारी दुपारी तेथील गुढीपूर येथे असलेल्या गौरव बियर बारच्या नजीक असलेल्या आंब्याच्या झाडाला समीर यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत तेथील ग्रामस्थांना दिसला. त्याचे मेहुणे अमृत गंगावणे यांना कल्पना देताच ते घटनास्थळी आले. पिंगुळीचे उपसरपंच सागर रणसिंग, प्रसन्ना गंगावणे, दीपक कुंबरे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. समीर यांनी या बियर बारच्या बाजूला एका घराकडील दोरी व तेथील खुर्चीचा वापर करून दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. कुडाळचे सहायक पोलीस निरीक्षक लंगवे व उपनिरीक्षक शेडगे यांनी तेथे भेट दिली. हवालदार अनिल पाटील, ममता जाधव यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

