उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दोन्ही राणे बंधूंनी घेतले ग्रामदैवतेला साकडे
*🛑उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दोन्ही राणे बंधूंनी घेतले ग्रामदैवतेला साकडे*
*🛑खासदार नारायण राणे,व कुटुंबिय रामेश्वर व लक्ष्मीनारायण च्या दर्शनाला*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२८:-* माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आणि कुटुंबियांनी आज येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि नारायणाचे दर्शन घेतले. यावेळी कुडाळ मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या माजी खासदार निलेश राणे आणि कणकवली मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्या विजयासाठी ग्रामदेवतेला साकडे घालण्यात आले. खासदार नारायण राणे यांचे रामेश्वर नारायण मंदिर परिसरात आगमन होताच पारंपरिक वाद्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. तर सुहासिनींच्या वतीने त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी नीलम राणे, प्रियांका राणे, अभिराज राणे उपस्थित होते. याठिकाणी रामेश्वर देवस्थानच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नारायण मंदिरात राणे कुटुंबाने ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर याठिकाणी निलेश राणे, नितेश राणे यांच्या विजयासाठी साकडे घालण्यात आले. यानंतर श्री रामेश्वर मंदिरात जाऊन राणे कुटुंबियांनी दर्शन घेतले. तेथेही निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या विजयासाठी साकडे घालण्यात आले.यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, राजू वराडकर, ललित चव्हाण, निशय पालेकर, दिलीप बिरमोळे, दाजी सावजी, आबा हडकर, जगदीश गावकर, हरेश गावकर, नारायण लुडबे, विक्रांत नाईक, शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, बाळू नाटेकर, सोनाली पाटकर, ऋत्विक सामंत, पूजा करलकर, पूजा सरकारे, राणी पराडकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर यांच्यासह भाजपा आणि शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

