मळगाव वाचनालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त उत्कृष्ट वाचकांचा सन्मान
*🛑मळगाव वाचनालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त उत्कृष्ट वाचकांचा सन्मान*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-२६:-* मळगांव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर तर्फे वाचनालयाच्या रमाकांत सूर्याची खानोलकर सभागृहात माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
व्यासपीठावर ग्रंथालयाचे उपाध्यक्ष मा. श्री. महेश प्रभाकर पंतवालावलकर प्रमुख अतिथी मा. श्री. दिवाकर पांडुरंग राऊळ (माजी मुख्या. मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव) ज्येष्ठ वाचक सन्मान मुर्ती श्री. अरुप दत्तात्रय मेस्त्री तसेच सौ. सोनाली यशवंत कारेकर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत ग्रंथालयांचे उपाध्यक्ष मा. श्री. महेश प्रभाकर पंतवालावलकर यांच्या हस्ते स्वागत कार्ड देवून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसचे प्रमुख अतिथींचा परिचय ग्रंथालयाचे कार्यवाह श्री. गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व त्यानंतर स्व. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी ग्रंथालयाने कोकणचे थोर साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्म शताब्दी निमित्त त्यांच्या साहित्य कृतीचे (ग्रंथ प्रदर्शन) मांडण्यात आले होते. त्याचे उदघाटन प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्या आले.
ग्रंथालयाने उत्कृष्ट वाचक म्हणून निवड केलेल्या वाचकांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ वाचक सभासदामधून श्री अरुण दत्तात्रय मेस्त्री तसेच सौ. सोनाली यशवंत कारेकर यांचा सन्मान शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व ग्रंथभटे देवून करण्यात आला. त्यानंतर साधारण गटातून निवडलेल्या सौ. प्रणाली प्रसाद सोनुर्लेकर, सौ. वेदिका विश्वनाथ गोसावी तसेच बाल सभासद गटातून निवडलेल्या कु. मानसी प्रविण डोंगरे, कु. साक्षी भास्कर वेर्गुर्लेकर यांचा सन्मान ग्रंथभेट, गुलाब पुष्प व रोख रक्कम देवून करण्यात आला. यावेळी सन्मान मुर्ती श्री. अरुण मेस्त्री व सौ सोनाली कारेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयाचे बाल वाचक सभासद कु. ईश्वरी उमेश साटेलकर कु. मानसी प्रवीण डोंगरे, कु. त्रिशा कृष्णाजी गावकर, कु. दशरथ पंढरीनाथ गावकर यांनी आपली मनोगत सादर केली. सदरचा कार्यक्रम मळगांवच्या सुकन्या श्रीमती. उज्ज्वला यशवंतराव खानविलकर / पटेकर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ ग्रंथालयाकडे ठेवलेल्या ठेव रक्कमेच्या व्याजातून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. दिवाकर राऊळ सर यांनी डॉ. ओ.पी.जे अब्दुल कलाम हे मुलांमध्ये रमणारे व्यक्तिमत्व होते. मुलांनी सतत वांचल लिहील पाहिजे युवा पिढी आपल्या महान देशाचे आधारस्तंभ आहेत त्यांनी समृध्द भारताचे स्वप्न पाहिले पाहिजे असे ते नेहमी म्हणत वाचना विषयी बोलताना वाचन हे प्रभावी माध्यम आहे. वाचनामुळे संवेदनशीलता, माणुसकी राष्ट्रनिष्ठा, जागृत होते वाचनामुळे व्यक्तिगत विकासा बरोबर सामाजिक विकास साधला जातो. अशा प्रकारे मौलिक मार्ग दर्शन उपस्थिताना केले.
कार्यक्रमाला वाचन मंदिरचे माजी अध्यक्ष श्री. हेमत खानोलकर ज्येष्ठ संचालक श्री मुळीकसर पालक, विद्यार्थी, वाचन प्रेमी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कार्यवाह श्री. गुरुनाथ नार्वेकर यानी केले तर आभार प्रदर्शन संचालक श्री. पृथ्वीराज बांदेकर यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

