कोकणमहाराष्ट्रवैभववाडी

वैभववाडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा !

*🛑वैभववाडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वैभववाडी, दि-२५:-* यंदाच्या वर्षातील सर्वात जास्त पाऊस तालुक्यामध्ये झाला असून गेले पंधरा दिवस वैभववाडी तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेतीचे प्रत्यक्ष पंचनामे करून शासनाने वैभववाडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैभववाडी तालुका अध्यक्ष महेश कदम यांनी वैभववाडी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीचा पाऊस कोसळत आहे. या सतत कोसळत असलेल्या पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. भातशेती जमीनदोस्त होऊन पाण्यात कुजत आहे. तर बऱ्याच ठिकाणी भाताला कोंब फुटून आले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला जात आहे. त्यातच जंगली प्राण्याकडूनही मोठे नुकसान केले जात आहे. त्यामुळे दुहेरी कात्रित शेतकरी सापडला आहे. आता खायचे काय व गुरांना वैरण कोणती घालायची असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ तुटुपुंजी नुकसान भरपाई नको तर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे
प्रत्येकवेळी फक्त पंचनामे केले जातात. परंतु, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. आपण याप्रकरणी जातीनिशी लक्ष घालून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!