कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

रुसून बसलेले रूपेश राऊळ यांना राजन तेली यांच्याकडून कितीची पैठणी मिळाली ?

*🛑रुसून बसलेले रूपेश राऊळ यांना राजन तेली यांच्याकडून कितीची पैठणी मिळाली ??*

*🛑शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अँड.निता कविटकर यांचा खोचक सवाल*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*

*🎴सावंतवाडी, दि-२४:-* निवडणुका डोळ्यासमोर ठेवून साड्या वाटल्या नसून दसरा कार्यक्रमानिमित्त गोरगरीब महिलांना साड्या वाटण्यात आल्या होत्या. दीपक केसरकर यांनी आजच नाही तर आमदार नसल्यापासून ते सण, उत्सवांना मदत करतात. त्यामुळे नाहक केसरकर यांची बदनामी करण्यापेक्षा रूसलेल्या, फुगलेल्या उबाठा विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी माजी आमदार राजन तेलींकडून कितीची ‘पैठणी’ घेतली ? या प्रश्नांचे उत्तर द्यावे असे आव्हान शिवसेनेच्या महीला जिल्हाप्रमुख अँड. निता कविटकर यांनी दिले.

अँड. कविटकर म्हणाल्या, नुकताच माजी आमदार राजन तेली यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी रुसून बसलेले रूपेश राऊळ यांना राजन तेली यांच्याकडून कितीची पैठणी मिळाली ? याचा त्यांनी खुलासा करावा. दीपक केसरकर यांच्यासह त्यांना काम केलेलं आहे. ते आजच नाही तर आमदार नसल्यापासून गोरगरीबांना वाटप करतात. त्यांचा सण आनंदात व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. याची जाण रूपेश राऊळ यांना असताना त्यांना केवळ राजकारण करू नये असा टोला शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अँड निता सावंत यांनी हाणला. दरम्यान, दीपक केसरकर हे घाबरणारे नेते नाहीत त्यामुळे राजन तेली व रूपेश राऊळ यांनी केसरकरांची कितीही बदनामी केली तरी केसरकर ते पुन्हा जिंकणार आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे महिला एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राजन तेली, रूपेश राऊळ यांनी टीका करण्यापेक्षा महिला दिन, सण उत्सवात महिलांसाठी उपक्रम राबवावे असा सल्ला महिला तालुकाप्रमुख यशश्री सौदागर यांनी दिला. यावेळी जिल्हाप्रमुख अँड निता कविटकर, तालुकाप्रमुख यशश्री सौदागर, अमिता नाणोसकर, अनुराधा वराडकर, स्नेहा मुळीक, श्रावणी नाईक, प्रचिती कुबल, उत्कर्षा गांवकर, चैत्राली गावडे, स्नेहा कुडतरकर आदि उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!