कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सोनुर्ली बसच्या वेळेत बदल केल्याने शालेय विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय

*🛑सोनुर्ली बसच्या वेळेत बदल केल्याने शालेय विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

*🎴सावंतवाडी, दि-२४:-* सावंतवाडी आगारातून सकाळी सव्वा नऊ वाजता सुटणाऱ्या सावंतवाडी सोनुर्ली बस फेरीच्या वेळेत एसटी प्रशासनाने अचानक बदल केल्याने शालेय विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहे.त्यामुळे सदरची बस फेरीपूर्वीच्याच वेळेत पूर्ववत सुरु करा अशी मागणी सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी एसटी स्थानकप्रमुख आर.एन.कांबळी यांच्याजवळ आज निवेदनाद्वारे केली.
सोनुर्ली गावात गेल्या वर्षापासून सावंतवाडी बस स्थानकातून सकाळच्या वेळेत साडेनऊ वाजता सोडण्यात येणाऱ्या एसटी बस फेरीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नव्हता सदरची बस ही शालेय विद्यार्थी तसेच सावंतवाडी बाजारपेठेत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांसाठी फायद्याची व सोयीची ठरत होती.सोनुर्ली गावातील विद्यार्थी हायस्कुलसाठी जाण्यासाठी याच बस फेरीचा वापर करतात तसेच जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि सावंतवाडीमध्ये कॅालेजसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बस महत्त्वाची ठरते मात्र अलीकडे या बसची वेळ बदलून ती पावणेदहा अशी करण्यात आली आहे.अर्धा तास उशिराने सोडणारी ही बस सावंतवाडीमध्ये वेळेत पोहोचत नाही त्यामुळे विद्यार्थी वर्ग तसेच अन्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.त्यामुळे ही बस पूर्वीच्याच वेळेत सव्वानऊ वाजता सावंतवाडीतून सोडण्यात यावी अशी मागणी उपसरपंच श्री.गावकर यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
उपसरपंच श्री.गावकर यांच्या म्हणण्यानुसार कुठलीही ग्रामपंचायतला पूर्वकल्पना न देता या बसचा वेळ बदलण्यात आलेला आहे.वारंवार या संदर्भात स्थानक प्रमुख तसेच कणकवली कार्यालयातील वरिष्ठांकडे यासंदर्भात मागणी करुनही एसटीचा वेळ बदलण्यात आलेला नाही.त्यामुळे आज निवेदनातून पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.दिवाळी नंतर बसफेरी पूर्वीच्या वेळेनुसार सोडण्यात येण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.मात्र दिवाळी नंतर ही बस वेळेत न आल्यास विद्यार्थी व ग्रामस्थांना घेऊन स्थानकामध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!