कोतवालाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघे निर्दोष
*🛑कोतवालाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघे निर्दोष*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२४:-* सावंतवाडी तालुक्यातील डेगवे- डिंगणे येथील तलाठी कार्यालयातील कोतवाल संतोष राजाराम नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डिंगणे येथील चंद्रकांत गणपत सावंत, नितीन श्रीधर सावंत व प्रदीप गणपत सावंत यांची सहाय्यक सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. १४ डिसेंबर २०२० रोजी रात्री कोतवाल संतोष नाईक यांनी घरी गवतावर फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या केली होती. याबाबत त्यांची मुलगी ऐश्वर्या हिने बांदा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार गावातील चंद्रकांत, नितीन व प्रदीप सावंत यांच्या जमिनीत झालेल्या खोदकामाबाबत बांदा मंडळ निरीक्षक यांच्याकडे आपल्या वडिलांनी तक्रार केल्याचा समज करून घेऊन १४ डिसेंबर रोजी चंद्रकांत सावंत याने घरी येऊन आई-वडिलांना धमकी दिली होती. आम्ही मानकरी असून तुमच्यावर जाब देणार असल्याच्या धमक्या दिल्याने वडील तणावात होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले होते. त्यानुसार तक्रार नोंदविली होती. सुनावणीत आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. साक्षीदार जयेश सावंतशी असलेले राजकीय वैमनस्य व तत्कालीन एका तलाठ्याकडील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप या गोष्टी पुराव्यात उघड झाल्याने तसेच साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही विश्वासार्ह पुरावा न आल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
