चिपी-मुंबई विमानसेवा २६ पासून होणार बंद
*🛑चिपी-मुंबई विमानसेवा २६ पासून होणार बंद*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴परुळे, दि- २४:-* ऐन दिवाळी आणि निवडणुकीच्या तोंडावर चिपी-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून बंद होत आहे. याबाबत प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षातील देश आणि राज्य पातळीवर नेतृत्व करणारे डझनभर लोकप्रतिनिधी असतानादेखील चिपी-मुंबई नियमित विमानसेवा सुरू ठेवण्यात अपयशी ठरले आहेत. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी ते मुंबई विमानसेवेचे उद्घाटन केले होते. ही विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत येत्या २६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला व सकारात्मक प्रतिसाद होता. मात्र, असे असताना आता ऐन दिवाळी आणि निवडणुकीच्या काळात ही विमानसेवा बंद होत आहे. सामान्य जनता या विमानसेवेच्या लाभापासून वंचित राहणार असल्यामुळे अनेक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
*तीन वर्षांचा करार संपला*
मुंबई ते सिंधुदुर्ग आणि रिटर्न या हवाई प्रवासाची तिकीट विक्री २६ तारीखपासून बंद होणार आहे. एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमानसेवा सुरू होती. खराब हवामानामुळे वारंवार अचानक चिपी-मुंबई विमानसेवा अनेकवेळा रद्द झाली होती.
*श्रेय घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता पुढे यावे*
परुळे-चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ सुरू झाला, तेव्हा सर्वच पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधी विमानतळ आपणच सिंधुदुर्गात आणला आणि आपल्यामुळे झाले, अशा घोषणा आणि गर्जना केल्या होत्या. मात्र, आता चिपी-मुंबई विमानसेवा बंद होत असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी निवडणुकांमध्ये मग्न झाल्याने विमानसेवा बंद होत आहे, याकडे लक्ष द्यायला याच लोकप्रतिनिधींना आता वेळ नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. श्रेय घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी चिपी-मुंबई सेवा नियमित करण्यासाठी पुढे यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_