साडेचार हजार निवडणूक कर्मचारी तैनात
*🛑साडेचार हजार निवडणूक कर्मचारी तैनात*
*🛑निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२३:-* विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजल्यानंतर निवडणूक विभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या नेमणूका जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केल्या आहेत. ४५०० कर्मचारी तसेच भरारी व स्थिर पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तीनही मतदारसंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या नेमणूका केल्या आहेत. त्यात कणकवलीसाठी कणकवलीचे उपविभागीय अधिकारी जगदिश काकतकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी व कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. कुडाळसाठी कुडाळच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांची निवडणूक निर्णय अधिकारी व कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. सावंतवाडीसाठी सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांची निवडणूक निर्णय अधिकारी व सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान असले, तरी पूर्व तयारी करण्यासाठी व निवडणूक प्रशिक्षण देऊन कर्मचाऱ्यांना तयारीत ठेवण्यासाठी ४५०० निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ९२१ मतदान केंद्रे असून मतदान केंद्रावर प्रत्येकी तीन कर्मचारी तसेच २३ नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीसाठी लागणारे कर्मचारी आणि कार्यालयीन कामासाठी लागणारे कर्मचारी मिळून ४,५०० निवडणूक कर्मचारी म्हणून घेण्यात आले आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणारी बेकायदेशीर दारू वाहतूक, पैसे, अमली पदार्थ यांच्या वाहतूकीवर लक्ष ठेवणे तसेच संशयित व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी व्हीडिओ सर्व्हलन्स टीम, स्थिर व भरारी पथके नेमली असून जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तपासणी नाक्यांवर ही पथके तैनात केली आहेत. यातील भरारी पथके ही राजकीय कार्यक्रमांवर लक्ष ठेवून राहणार आहेत. विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत वेळ ठेवण्यात आली आहे. २० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता सकाळी सहापर्यंत मुदत दिली आहे, अशी, माहिती निवडणूक विभागाकडून उपलब्ध झाली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

