हायस्पीड ट्रॉलर्स थांबविण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान तात्काळ वापरा !
*🛑हायस्पीड ट्रॉलर्स थांबविण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान तात्काळ वापरा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२२:-* मालपीच्या हायस्पीड ट्रॉलर्सची अतिक्रमण थांबविण्यासाठी तात्काळ ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी मागणी भाजप मच्छीमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी मत्स्य व्यवसाय विभागाच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. तोरसकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या ७२१ किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीपासून राज्याच्या हद्दीत येणाऱ्या १२ सागरी मैलापर्यंतच्या सागरी जलधी क्षेत्रामध्ये गेले कित्येक वर्ष कर्नाटक व गोवा येथील हायस्पीड ट्रॉलरची बेकायदेशीर मासेमारी चालू आहे, महाराष्ट्राच्या सागरी जलधी क्षेत्रामध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग गस्तीनौकेचा वापर करतो. परंतु परप्रांतीय नौका अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची तयारी यामुळे उपलब्ध असलेल्या गस्तीनौकेद्वारे अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. यासाठी सिंधुदुर्गातील मच्छीमार संघटनांनी – २०१४ साली ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याबाबत मालवण किनारीप्रात्यक्षिक दिले होते. भाजप मच्छीमार सेल, सिंधुदुर्गच्या माध्यमातून राजकीय आणि प्रशासकीय पाठपुरावा गेली दहा वर्षे चालू होता. सदर विषयातील गांभीर्य लक्षात घेऊन ड्रोन तंत्रज्ञानाचा, सागरी गस्तीसाठी वापर करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. त्याचबरोबर संबंधित निविदा जुलै २०२४ मध्ये निविदा जाहीर केली. सदर निविदेसाठी राष्ट्रीय पातळीवरील अनुभवी व संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रगत आस्थापनांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. नुकत्याच मालवण येथे पकडलेल्या टॉलरमध्ये सुमारे पाच लाख रुपये किमतीची सहा टन मासळी आढळून आली. ज्याच्या दंडातून महाराष्ट्र शासनाला किमान ३० ते ४० लाख रुपये महसूल दंड रुपात मिळू शकतो. स्थानिक मच्छीमारांची उपजीविका तसेच सागरी पर्यावरण व शासनास मिळणारा महसूल याचा विचार करता मलपी, कर्नाटक येथील परप्रांतीयांची हायस्पीड ट्रॉलर्सद्वारे केली जाणारी मासेमारी थांबविण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी मागणी तोरसकर यांनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_