कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

आयराईस इनोव्हेटिव्ह चॅम्पियन्ससाठी पांडुरंग काकतकर यांची निवड

*🛑आयराईस इनोव्हेटिव्ह चॅम्पियन्ससाठी पांडुरंग काकतकर यांची निवड*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-२२:-* इंस्पायरींग इंडिया फॉर रिसर्च अँड सायन्स एज्यूकेशन (IRISE) संस्थेद्वारे इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (IISER) पुणे येथे आयोजित कार्यशाळेसाठी माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्लीचे राज्य शासन पुरस्कारप्राप्त उपक्रमशील विज्ञान शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांची इनोव्हेटिव्ह चॅम्पियन म्हणून निवड केली.सदर राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी राज्यात विविध उपक्रम राबविणाऱ्या निवडक अनुभवी शिक्षकांची निवड करण्यात आली होती त्यात विज्ञान विषयक अनेक उपक्रम राबवून शैक्षणीक क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढविलेले अनुभवी विज्ञान शिक्षक पांडुरंग काकतकर यांचा समावेश होता.शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी तसेच कृतियुक्त अध्यापनातून विद्यार्थ्यांचे अध्ययन आनंददायी करण्यासाठी आयराईस आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहयोगाने शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.त्यात विज्ञान विषयातील संकल्पनांचे सखोल आकलन होण्यासाठी मॉडेल मेकिंग, बिंगो, प्ले रोल, पझल बेसड, सिमुलेशन, रियल लाईफ, केस स्टडी, थिंक पेयर शेयर, क्रियेटीव्ह थिंकिंग, को ऑपरेटिव्ह लर्निग, इंक्वायरी बेसड, स्टोरी टेलिंग, व्हिज्युअल एड, ॲक्टिव्ह लर्निग यासारख्या विविध तंत्रांचा वापर याबद्दल मार्गदर्शन व प्रात्यक्षिके यांबद्दल सराव घेण्यात आला.आयराईच्या या तंत्रांचे प्रशिक्षण राज्यांतील प्रत्येक जिल्हयातील निवडक विज्ञान, गणित शिक्षकांना पुढील कॅस्केड देण्याचे नियोजन आहे.
पाषाण रोड, पुणे येथील आयसरच्या सभागृहातील सदर प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचेच्या उपसंचालक कमलादेवी आवटे, आयसरचे डायरेक्टर सुनिल भागवत, आयरिसचे प्रमुख श्रीधर शुक्ला,प्रोजेक्ट डायरेक्टर हरिदास चक्रपाणी, राज्य विज्ञान विभाग प्रमुख तेजस्विनी आळवेकर, यांसह आयराईसची विज्ञान तज्ज्ञ मार्गदर्शक टीम व राज्यातील विज्ञान विषयाचे तज्ञ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!