लोन ऑफिसरने केला साडेपाच लाखाचा अपहार
*🛑लोन ऑफिसरने केला साडेपाच लाखाचा अपहार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२१:-* स्पंदना स्फूर्ती फायनान्स लि. कंपनीच्या कुडाळ शाखेत महिला समूहातील कर्जदारांकडून गोळा केलेला देय तिथीनुसार हप्ता व मुदतपूर्व रक्कम त्या कर्जदाराच्या खात्यावर नोंद न करता लोन ओं फिसरनेच ५ लाख ४७ हजार ६३५ रु. चा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जानेवारी २०२२ ते जुलै २०२४ या मुदतीत हा अपहार झाला आहे. या प्रकरणी या फायनान्स कंपनीचे झोनल मॅनेजर उमेश मारोतराव हलमारे (रा. अमरावती) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार लोन ऑ फिसर दिलीप राजाराम पाटील (रा. पन्हाळा-कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पंदना स्फूर्ती फायनान्स लि. कंपनीचे कुडाळ-नाबरवाडी येथे शाखा कार्यालय आहे. या शाखा कार्यालयात लोन ऑफिसर म्हणून दिलीप राजाराम पाटील १८ मे २०१९ ते १५ जुलै २०२४ पर्यंत कार्यरत होता. महिलांच्या समूहांना ग्रुप गॅरंटीवर लघु मुदतीसाठी कर्ज वाटप करणे, देय तिथीनुसार हप्ता गोळा करणे आणि गोळा केलेला हप्ता सिस्टीममध्ये कर्जदाराच्या खात्यावर नोंद करणे, असे त्याचे मुख्य काम होते. साधारणतः जुलै २०२४ च्या पहिल्या आठवड्यात रिझवाना शकूर शेख (रा.
सावंतवाडी-सालईवाडा)
यांच्यासह अन्य काही महिला कर्जदार यांनी प्रीलोन बंद करूनही त्यांचे कर्जखाते सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर याबाबत खात्री केली असता, दिलीप पाटील याने जानेवारी २०२२ ते जुलै २०२४ या कालावधीत एकूण ६ लाख ५७ हजार ७८५ रु. एवधी रक्कम कर्जदारांकडून देय तिथीनुसार हप्ता व मुदतपूर्व रक्कम गोळा केली. त्यापैकी १ लाख १० हजार १५० रु. रक्कम सिस्टीममध्ये कर्जदाराच्या खात्यावर दिलीप याने नोंद केली. तर शिल्लक ५ लाख ४७ हजार ६३५ रु. रकमेचा आर्थिक अपहार केल्याचे कंपनीच्या अंतर्गत निष्पन्न झाले. १० ऑगस्ट २०२४ रोजी दिलीप पाटील याला त्याच्या मोबाईल क्रमांकावर फिर्यादीने संपर्क साधून हा आर्थिक गैरव्यवहार व अपहाराबाबत विचारले असता, त्याने प्रथमतः उडवा-उडवीची उत्तरे दिली व स्वतःचा मोबाईल बंद केला. त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. या प्रकरणी दिलीप राजाराम पाटील (३१) याच्यावर भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर तपास करत आहेत. पोलीस कर्मचारी स्वप्नील तांबे व गणेश चव्हाण त्यांना सहाय्य करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

