शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या !
*🛑शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या !*
*🛑स्थानिक डीएड, बीएड बेरोजगारांची मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि- १८:-* सिंधुदुर्ग जिल्हात सुरू असलेल्या कंत्राटी शिक्षक भरतीत मुख्य. कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार स्थानिक उमेदवारांनाच घेण्यात यावे. असे आदेश असताना पळवाट काढून जिल्ह्याबाहेरील उमेदवारांची निवड केली जात आहे. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची प्राधान्याने निवड करावी, अशी मागणी स्थानिक डी.एड., बी.एड. बेरोजगारांकडून केली आहे. सन २०२३-२४ च्या संच मान्यतेनुसार परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक कंत्राटी पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार ही नियुक्ती करताना उमेदवार हा त्या शाळेच्या गावाच्या हद्दीतील रहिवासी असावा. जर त्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवार नसेल तर तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा. तसेच तालुक्यातही उमेदवार मिळाला नाही तर जिल्ह्यातील उमेद्वारांचा विचार करण्यात यावा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी डी.एड., बी.एड. बेरोजगारांकडून करण्यात येत आहे. कंत्राटी शिक्षक भरतीतही पळवाटा शोधून परजिल्ह्यातील उमेदवार येथील रहिवासी दाखवून भरती करण्यात आली तर स्थानिक उमेदवार कायमच बेरोजगार राहण्याची शक्यता आहे. आधीच त्यांच्यावर रोजगारासाठी पुणे, मुंबईसारख्या शहराकडे पळण्याची वेळ येत आहे. मात्र, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना त्याचे सोयरसुतक करण्यात पोर्टलमार्फत नसल्याचा आरोप येत आहे. पवित्र नुकत्याच झालेल्या शिक्षक भरतीत स्थानिकांवर अन्याय झाल्याची भावना स्थानिक उमेदवारांमध्ये आहे. त्यासाठी जिल्ह्यातील उमेदवारांनी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
