आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 एकाच कुटुंबातील घराणे शाही मान्य नाही ; माजी आमदार राजन तेली

🛑 राजन तेलींचा भाजपा प्राथमिक सदस्यत्व व सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी , दि -१८:– सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय उल्कापात होताना दिसत आहेत .यातच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार राजन तेली यांनी आपला भाजपा प्राथमिक सदस्यत्व व सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा मंजूर करण्याबाबत पत्र देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र , रविंद्र चव्हाण , बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिले आहे .

दिलेल्या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की , मी गेली 10 वर्षे आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे दिवसरात्र मेहनत करून सर्वाना बरोबर घेऊन पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले. आपण सर्वांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन केले. 2019 ला कणकवली विधानसभेमध्ये शिवसेनेचे सतीश सावंत यांना शिवसेनेने अधिकृत उमेदवारी देवून आपल्या भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभे केले म्हणून मला AB फॉर्म दिला होता परंतू तत्कालीन भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील,रविंद्र चव्हाण, संघटनमंत्री सतीश धोंड यांच्याकडून निरोप आला की शिवसेनेकडून चूक झाली असेल तरी त्यावेळी आपण चुक करता कामा नये म्हणून मी AB फॉर्म पक्ष नेतृत्वाच्या आदेशामूळे दिला नाही.

‘त्याचप्रमाणे भाजपा पक्षात प्रवेश केलेल्या राणे कुटूंबियांचा अंतर्गत होत असलेला त्रास तसेच सिंधुदूर्ग जिल्हा बँक 2019 वी विधानसभा निवडणूक यामध्ये माझा पराभव करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधक निर्माण करणे (यासाठी साम दाम, दंड, भेद यांचा वापर करणे) पूर्वीच्या या सर्व त्रासाला कंटाळून मी भाजप पक्षात प्रवेश करून पक्ष संघटना वाढीसाठी काम केले. फक्त बांदा शहरापुरती मर्यादित असलेली भाजपा संपूर्ण सावंतवाडी मतदार संघात वाढविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन अतोनात परिश्रम केले. परंतू पुन्हा राणे कुटूंबिय भाजपा पक्षात दाखल होवून आमचे खच्चीकरण करण्याचे तसेच त्यांच्यापासून दूर गेलेल्या सर्वांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित आहेत. मी घोटगे सारख्या अत्यंत ग्रामीण भागात सामान्य कुटूंबात जन्मलो. कष्टाने माझी राजकीय कारकिर्द घडवली. ज्या राजकीय पक्षात गेलो, तिथे 100% प्रामाणिकपणे काम केले, स्वतःच्या मेहनतीने माणसे जोडली. पण एकाच कुटूंबाला एक लोकसभा, दोन विधानसभा आणि त्यांच्या कलानेच चालणारा तिसरा विधानसभा मतदारसंघात उमेद्वारी देणे मला योग्य वाटत नाही. ही घराणेशाही मला मान्य नाही.

याबाबत सातत्याने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलेले होते. त्याबाबत अदयाप कोणतीही कार्यवाही झालेली नाही यामध्ये वरिष्ठांचा नाइलाजही असू शकतो हे मी समजू शकतो. गेल्या 10 वर्षात तुम्ही सर्वांनी भरपूर प्रेम दिलं त्याबददल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. आपण केलेल्या सहकार्याबददल मी आपला आभारी आहे.

तरी माझा भाजपा प्राथमिक सदस्य तसेच भाजपा विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा मंजूर करावा ही विनंती माजी आमदार राजन तेली यांनी वरिष्ठांकडे केली आहे .

तसेच माजी आमदार राजन तेली आज मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत .

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!