कोकणशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

हिंसाग्रस्त महिलांना आधार देणारी वन स्टॉप सेंटर योजना..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.18: हिंसाग्रस्त महिलांना आधार देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार पुरस्कृत वन स्टॉप सेंटर ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. शारिरीक, मानसिक, कौटुंबिक अशा कोणत्याही प्रकारच्या हिंसेस बळी पडलेल्या महिलेस आधार देऊन त्यांना कायदेविशयक, समुपदेशन, वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवणे व दिलासा देणे हा या केंद्राचा उद्देश आहे. कोणहीती हिंसाग्रस्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते.

या वन स्टॉप सेंटरमध्ये कोणत्याही वयोगटातील महिलांना कोणत्याही मदतीसाठी वन स्टॉप सेंटर शी संपर्क साधता येवू शकतो. केंद्र शासनाने हिंसाचार ग्रस्त महिलांना आणि बालिकांना सुलभ व सुखकर आयुष्यासाठी मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीने महिला व बाल विकास विभागातर्फे संयुक्त विद्यमाने या सेंटरची स्थापना केली आहे. या सेंटर अंतर्गत पिडितेस आपत्कालीन वैद्यकीय सेवा, पोलीस सेवा, कायदेविषयक सल्ला व मदत, मानसिक समुपदेशन पुरविण्यात येते. तसेच आवश्यक असल्यास 5 दिवस तात्पुरत्या वास्तव्याची सुविधाही पुरविण्यात येते.  हिंसाचारग्रस्त महिलांना तातडीची मदत म्हणून वन स्टॉप सेंटरही आधआर व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत 182 सेंटर्स उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 1 लाख 30 हजार पेक्षा जास्त महिलांनी याचा लाभ घेतला आहे. नव्याने मंजूरी देण्यात आलेल्या नियमांप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वन स्टॉप केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या सेंटरच्या व्यवस्थापक समितीच्या अध्यक्ष हे जिल्हाधिकारी हे आहेत. सदस्य सचिव हे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी आहेत. हे सेंटर जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या अधिनस्त कार्यरत आहे. तरी कोणतीही हिंसाचरग्रस्त महिला स्वतःचे प्रश्न घेऊन या ठिकाणी मदतीसाठी येऊ शकते.

या वन स्टॉप सेंटरचा उद्देश पुढल प्रमाणे आहे. हिंसाचारामुळे पिडीत महिलांना खाजगी व सार्वजनिक ठिकाणी, कुटुंब व समुदाय आणि कार्यस्थळांवर आधार देणे, वय, वर्ग, वंश , शैक्षणिक स्थिती, वैवाहित स्थिती, वंश आणि संस्कृतीची, पारंपारिक रुढींची पर्वा न करता शारिरीक, लैंगिक, भावनिक, मानसिक, आर्थिक अत्याचार होणाऱ्या महिलांना सहाय्य करणे, लैंगिक छळ, घरगुती हिंसाचार, तस्करी, सन्मानाचे गुन्हे, ॲसिड हल्ला किंवा जादुटोणा संदर्भातील स्त्रियांविरोधातील हिंसाचाराचे गुन्हे या प्रकारांना सामोऱ्या जाणाऱ्या स्त्रियांना वन स्टॉप सेंटर मार्फत विशेष सेवा पुरविल्या जातात. पिडितेस एका छताखाली एकात्मिक सहाय्य देणे व समर्थन प्रदान करणे, तसेच वैद्यकीय, कायदेशीर, मानसशास्त्रीय आणि समुपदेशन सहाय्यासाठी अनेक तातडीच्या व आपत्कालीन सेवा पुरवणे.

या केंद्रातर्फे तात्काळ प्रतिसाद व हिंसेपासून सुटकेसाठी सेवा, वैद्यकीय सुविधा, हिंसाग्रस्त महिलेला एफआयआर, एनसीआर, डीआयआर भरणेसाठी मदत करणे, मनोसामाजिक आधार, समुपदेशन, कायदेविषयक मदत व समुपदेशन, निवास व्यवस्था व व्हीडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा या सेवा पुरविण्यात येतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय परिसर येथील टाईप फोर, इमारत क्रमांक 6, रुम नं. 1 येथे सदर केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये सध्या 13 कर्मचारी कार्यरत आहेत. . तरी कोणतीही हिंसाचरग्रस्त महिला स्वतःचे प्रश्न घेऊन या ठिकाणी मदतीसाठी येऊ शकते. अधिक माहितीसाठई संपर्क क्र. 02362-229039 किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय – 02362-228869 या क्रमांकावर संपर्क साधावा असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सिंधुदुर्ग हे कळवितात.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!