३७३ शिक्षकांना मिळणार जुनी पेन्शन
*🛑 ३७३ शिक्षकांना मिळणार जुनी पेन्शन..*
*🛑 २००५ पूर्वीच्यांना लाभ : सहा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचाही समावेश..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-१२:-* शासकीय पदभरतीची जाहिरात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निर्गमित झालेल्या आणि त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या जिल्ह्यातील ३७३ शिक्षक आणि सहा विस्तार अधिकारी यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती जुनी पेन्शन हक्क संघटना राज्याध्यक्ष प्रवीण पाताडे यांनी दिली. १ नोव्हेंबर २००५ पासून शासकीय सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचे शासनाकडून बंद करण्यात आले आहे. दरम्यान सर्वच कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ द्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. त्या अनुषंगाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात निघालेल्या आणि काही कारणास्तव पदभरती १ नोव्हेंबर २००५ नंतर झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जि. प. च्या शिक्षण विभागात कार्यरत असलेले अनेक शिक्षक हे याच प्रकारातील पद भरतीमुळे जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित होते. मात्र, १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची पदभरतीची जाहिरात असल्याने आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने ही भरती पुढे गेल्याने या कर्मचाऱ्यांना नवीन निर्णय लागू होत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शान किंवा युपीएस यापैकी कोणताही पर्याय निवडण्याची संधी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३७३ शिक्षकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. तर शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या सहा विस्तार अधिकाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे, असे प्रवीण पाताडे यांनी स्पष्ट केले. जुन्या पेन्शन योजनेबरोबरच युनिफाईड पेन्शन स्कीमचा विकल्प घेण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. जुन्या पेन्शनचा लाभ हवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विकल्प दोन महिन्यात संबंधित प्राधिकरणाकडे नोंदवावा व एनपीएस खाते बंद करावे, असेही स्पष्ट केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

