कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

डीएड बेरोजगार संघर्ष समितीचे आंदोलन कायम

*🛑डीएड बेरोजगार संघर्ष समितीचे आंदोलन कायम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-११:-* डीएड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या डीएड बेरोजगार संघर्ष समितीतील उमेदवारांनी ७ ऑक्टोबरच्या शासन निर्णयाला आक्षेप घेतला आहे. या निर्णयातील ग्रामपंचायत क्षेत्रातील उमेदवारांनाच संधी देण्याची अट जाचक असून ती शिथिल करावी आणि नव्याने शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी केली आहे. दहा किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जि. प. शाळेवर एक स्थानिक डीएड किंवा बी.एड बेरोजगार उमेदवार कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचे आदेश २३ सप्टेंबर रोजी देण्यात आले आहेत. यानुसार जि. प. शिक्षण विभागाने तात्काळ कार्यवाही करावी या मागणीसाठी विजय फाले यांच्या नेतृत्वाखाली डीएड बेरोजगार संघर्ष समितीने आठ ऑक्टोबरपासून जि. प. समोर साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान ७ ऑक्टोबर रोजी शासनाने या उमेदवारांच्या कंत्राटी नियुक्तीबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित करून त्यात संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य द्यावे. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम निश्चित करावा, असे स्पष्ट केले आहे. हा मुद्दा डीएड पदविका ज्येष्ठता डावलणारा असल्याचा आरोप संघर्ष समितीकडून करण्यात आला असून यात बदल करावा, अशी मागणी केली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे लक्ष वेधण्यात आले असून या नवीन शासन निर्णयात सुधारणा करावी, अन्यथा साखळी धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!