कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

गेळे ग्रामस्थांसाठी आजचा दिवस सोनेरी -सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रश्र सुटला -पालकमंत्री रविंद्र चव्हाण .

*🛑 गेळे ग्रामस्थांसाठी आजचा दिवस सोनेरी -सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रश्र सुटला -पालकमंत्री रविंद्र चव्हाण ..*

*🛑 रविंद्र चव्हाण; ग्रामस्थांना जमिनीचे वाटप, धडपडणारा कार्यकर्ता, संदीप गावडेंचे कौतुक…*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०९:-* गेळे ग्रामस्थांसाठी आजचा दिवस हा “सुवर्ण दिन” आहे केवळ महायुती सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे गेले पंचवीस वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सुटू शकला. याचा आपल्याला आनंद आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात येथील जनतेने आपले आशीर्वाद महायुती सरकारच्या पाठीशी ठेवावेत, असे आवाहन राज्याचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले. दरम्यान संदीप गावडे यांच्या सारख्या धडपडणाऱ्या कार्यकर्त्यामुळे या प्रश्नाला वाचा फुटली. त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतल्यामुळे हा प्रश्न सुटू शकला त्यामुळे त्यांचे कौतुक. असे सांगून गावागावात अशा प्रकारचे धडपडणारे कार्यकर्ते तयार व्हायला पाहिजेत, असे ते म्हणाले. गेळे येथील ग्रामस्थांना आज जमिनीचे वाटप पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. चव्हाण बोलत होते.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, भाजपचे युवा नेते संदीप गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, चौकुळ सरपंच सुरेश शेट्ये, जि. प. चे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, एकनाथ नाडकर्णी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, दिनेश गावडे, माजी नगरसेवक अॅड. परिमल नाईक, भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी नगरसेवक तानाजी वाडकर आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री पुढे म्हणाले, आंबोली, चौकुळ व गेळे या गावांमधील कबूलायतदार गावकर प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा विषय पुढे नेण्याचे काम केले. तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर व मी सातत्याने या प्रश्नाच्या पाठीशी राहून हा प्रश्न सोडविला. महायुती सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच हा प्रश्न सुटू शकला असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील हे महायुती सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळेच हे काम होऊ शकले. कोकणचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील होते. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने सर्व योजना बंद करण्याचे आपल्या काळात केले होते. या सर्व योजना सुरू करण्याचे काम महायुतीने केले हे ध्यानात ठेवावे लागेल. यासाठीच सर्वांनी माहिती सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांनी संदीप गावडे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, गेळे येथील जमीन वाटपाचा हा प्रश्न सोडविण्यासाठी संदीप गावडे हा कार्यकर्ता माझ्या दिवसरात्र सातत्याने मागे लागला होता. या जमीन वाटपा संदर्भात अभ्यासपूर्णरित्या माहिती गोळा करून ती प्रशासनाकडे सादर करून त्याचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करण्याचे काम संदीप गावडे यांनी केले. प्रसंगी उपोषणासारखा मार्गही स्वीकारला. गावासाठी झटणारे असे युवक गावागावात तयार झाले पाहिजेत.
महाराष्ट्राला हेवा वाटेल असे काम गेळे ग्रामपंचायत करून दाखवेल. आभार मानताना संदीप गावडे म्हणाले, पालकमंत्री रविंद्र चव्हाण बोलत नाही मात्र ते काम करून दाखवतात. त्यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य राहिले आहे. गेळे गावाच्या जमिनीचा प्रश्न सुटल्यामुळे आता या गावाच्या विकासात कोणतीही कमतरता भासणार नाही. पर्यटनाच्या माध्यमातून त्या गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. भविष्यात महाराष्ट्राला हेवा वाटेल असे काम गेळे ग्रामपंचायत करून दाखवेल असा विश्वास व्यक्त करताना गावडे यांनी गेळे गावचा हा प्रश्न सोडविल्याबद्दल दोन्ही मंत्र्यांचे व प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त केले. यावेळी गावातील युवकांनी तयार केलेले गावासाठीच्या पर्यटनाचे चित्र दाखवण्यात आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!