ग्रामसेवकांकडून बांधकाम कामगारांना दाखला मिळणार!
*🛑ग्रामसेवकांकडून बांधकाम कामगारांना दाखला मिळणार!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०९:-* आमदार वैभव नाईक यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांचे लक्ष वेधले. त्यामुळे
अखेर ग्रामसेवकांना बांधकाम कामगारांना ९० दिवस प्रमाणित दाखले द्या, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. आमदार नाईक यांनी सातत्याने सुरू ठेवलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदणी व नूतनीकरणासाठी शासनाच्या आदेशानुसार ग्रामसेवकांनी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणित दाखले देणे नियमाधीन असताना ग्रामसेवकांनी त्याला नकार देत संघटनेचा निर्णय सांगून विरोध दर्शविला होता. या संदर्भात आमदार वैभव नाईक यांनी बांधकाम कामगारांच्या पाठिशी राहत प्रशासनाला जाब विचारून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. तसा पत्रव्यवहारही करण्यात आला होता. आमदार नाईक यांच्या पत्राची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पूर्ववत दाखले देण्याचे ग्रामसेवकांना निर्देश देण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून टाळाटाळ होत असल्याने आमदार नाईक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी आज बैठक घेत जिल्हयातील सर्व बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांनी ९० दिवसांचे प्रमाणपत्र द्यावे, अशी
मागणी केली. अखेर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी जिल्हयातील सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवकांना दाखले देण्याचे निर्देश देण्याचे आदेश पत्राद्वारे दिले आहेत. यापुढे गोरगरीब, कष्टकरी कामगारांना दाखले देऊन ग्रामसेवकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार नाईक यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
