मच्छिमार नेते बाबी जोगी यांचा प्रसिद्धीपत्राद्वारे इशारा.
*🛑मच्छिमार नेते बाबी जोगी यांचा प्रसिद्धीपत्राद्वारे इशारा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*
*🎴मालवण , दि-०९:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे मच्छिमार नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे शासन तथा जिल्हाधिकारी आणि मत्स्यविभाग यांना इशारा दिला आहे. प्रसिद्धीपत्रात बाबी जोगी यांनी म्हणले आहे की आजच्या स्थितीला मच्छीमाऱांना मासे मिळणे कठीण झाले आहे. शेजारच्या कर्नाटक मलपी तथा परराज्यातील शेकडो बोटी मासेमारीसाठी धुमाकूळ घालत आहेत. या बोटी, दोन मोठ्या बोटींच्या जाळीच्या सहाय्याने सहाय्याने एक जाळे ओढतात. याला ‘जोत’ असे म्हणतात व या प्रकाराला शासनाची मनाई आहे तरी हे प्रकार घडतात. अशा शेकडो बोटी बारा वावा पासना बाहेर समुद्रात सर्व मासा गाळून काढत आहेत. त्यामुळे समुद्रात व किनाऱ्यावरती मासा टिकत नाही त्याचा परिणाम स्थानिक सर्वच छोट्या – मोठ्या मच्छीमाऱ्यांना भोगावा लागत आहे. परिणामी सिंधुदुर्ग व मालवणचा मच्छीमार पूर्ण आर्थिक अडचणीमध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य मच्छिमाराला दाद मिळत नाही. मत्स्यविभाग ही केवळ एक प्रशासकीय इमारत असून त्यामधील यंत्रणेची सूत्रे सामान्य मच्छिमारांसाठी नसून ती आणखी कोणाच्यातरी हातात आहेत का असा प्रश्न मच्छिमारांना भेडसावत आहे. जिल्ह्यातील सामान्य मच्छिमारांच्या पोटापाण्याच्या भूलभूत प्रश्नांना कोणी वालीच नसेल तर आम्हालाच समुद्रात उतरावे लागेल असे मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी म्हणले आहे. मच्छिमारांना रोजगार हा समुद्रातील मासेमारीच आहे परंतु तोच मासा जर परराज्यातील मच्छिमार चोरून नेत असेल तर आम्ही खायचे काय, प्रपंच कसा चालवायचा, लेकराबाळांची शिक्षण व आरोग्य याचा मेळ कसा जमवायचा याची शासनाला चिंता नसेल तर आम्हाला समुद्रात उतरावे लागले तर जबाबदार सुद्धा केवळ मच्छी खाते आणि सन्माननीय जिल्हाधिकारी असतील असे पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळवले आहे. परराज्यातील नौकांची मासेमारी व अवैध मासेमारी याबद्दल शासनाला शेकडो निवेदने दिली गेली आहेतच परंतु आतातरी सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आम्हाला तत्काळ न्याय मिळणे ही सध्याच्या कठीण काळाची आवश्यकता आहे असे मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी म्हणले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_