कणकवली न. पं. तर्फे ‘स्वच्छ प्रभाग स्पर्धा’
*🛑कणकवली न. पं. तर्फे ‘स्वच्छ प्रभाग स्पर्धा’*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०३:-* स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’ आयोजित केला होता. या वर्षी स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता हे अभियान कणकवली शहरात राबिवण्यात आले. या अभियानेंतर्गत महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून न.पं. मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्वच्छ प्रभाग स्पर्धेचे आयोजन केले आहे. बुधवारी न.पं. व कणकवली कॉ लेजतर्फे kankavali walkathon स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत शहरातील विद्यार्थी, नागरिक, कॉलेजचा प्राध्यापक वर्ग, न.पं.चे अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतून स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्पर्धेच्या बक्षीस
वितरणावेळी मुख्याधिकारी यांनी स्वच्छ प्रभाग स्पर्धेची घोषणा केली. स्पर्धेचा कालावधी महिन्याचा आहे. स्पर्धेत प्रभागात राहणारे नागरिक समूदाय, संस्था, बचत गट, शाळा, महाविद्यालय सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेसाठी लागणारे अर्ज व स्पर्धेची माहिती न.पं. कार्यालयात उपलब्ध आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक २५ हजार रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक १५ हजार रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र आणि तृतीय क्रमांकास १० हजार रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असणार आहे. प्रभागात स्वच्छतेबाबत उत्कृष्ट नाविन्यपूर्ण कल्पना राबविणाऱ्यास ५००० रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल. स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन शहराच्या स्वच्छतेसाठी पाऊल उचलावे, असे आवाहन मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

