पडवी, पडवीपठार येथे नवसाला पावणारा श्री. काळभैरव मंदिराचे अलौकिक रुप
*🛑पडवी, पडवीपठार येथे नवसाला पावणारा श्री. काळभैरव मंदिराचे अलौकिक रुप*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴महाड , दि-०३:-* डोंगराच्या कुशीत, गर्द झाडीत असणारे काळभैरवाचे हे एक स्थान.आठ दिशांची आठ प्रहरी राखण करणारा हा रक्षणकर्ता, जणू या गावाची इथे नाकेबंदी करूनच उभा आहे. नवसाला पावणारा काळभैरव याची महाड तालूक्यात श्रद्धा आहे पडवी व पडवीपठार गाव सैनिकाचे गाव असून बरचसे तरूण सैन्यात असून कित्येक लोक रिटायर्ड झाले आहेत सर्वाची या ग्रामदेवतेमूळे आम्हावर कोणतेही संकट येत नाही व या देवाच्या कृपेनेच आम्ही भरती होतो व सूखरूप परत येतो अशी भावना आहे . आवरातील भग्न अवशेष त्याच्या पुरातन अस्तित्वाची साक्ष देत आहेत. एका बाजूला मायबाप सह्याद्री पूर्व दिशेकडून साद घालत असताना, हे मंदिर दक्षिणाभिमुख असल्याचे प्रयोजन काही समजत नाही. जिर्णोध्दार केलेल्या या मंदिर प्रांगणात असणाऱ्या एका मारुती मुर्तीवर सुबक अशी छत्री बांधून त्यावर रंगरंगोटी केली आहे. आवारात इतरस्त्र जुन्या बांधकामाला वापरलेले दगड पसरले आहेत. तसेच आवारात जुनी-नवी थडगी सुद्धा आहेत.
बाजूलाच या मंदिराचे वेगळेपण सांगणारी एक गजांतलक्ष्मीची एक मूर्ती लक्ष वेधून घेते.( गजांतलक्ष्मी शिल्पे ही खूप कमी ठिकाणी पहायला मिळतात) महाड-पुणे रस्त्यावरील वरंध गावातून पडवी पठाराला जाणारा फाटा आहे. या फाट्यावरून पूल ओलांडून कुंभारकोंड गावात दोन फाटे लागतात. उजवीकडे गेल्यास वरंधच्या ‘अभिनव शिवथरघळला’ जाता येते आणि डावीकडे जाणारा रस्ता पठारावर घेऊन जातो. छोटासा घाट चढल्यावर दिसणारे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.
पडवी पठार ते रामदास पठार यांच्या मधे उष्ण कटीबंधीय जंगलाचा सदाहरित पट्टा आहे. यात वेगवेगळे औषधी गुणधर्म असणाऱ्या असंख्य वनस्पती आहेत. वन्य पशु-पक्षी अधून मधून झलक देऊन जातात.
दुर्दैव असे की ६०-७० उंबऱ्याच्या या गावात वाहतूक सुविधा जवळपास नाहीच. तसेच एका बाजूला कोपऱ्यात असल्याने इतर वाहतूकीची वानवा आहे. घाटातील रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे. स्थानिक लोकं सुमारे ५ किमी ची पायपीट करून बाजरासाठी वरंध गावात येतात. रामदास पठार ते पडवी पडवी पठार हा माळावरून २ किमी चा रस्ता व्हावा आणि रामदास पठारला येणारी बस पडवी पठारला यावी अशी स्थानिक लोकांची मागणी आहे याकरीता हनूमान विकास मंडळ मूंबई यानी नूकतेच मा. मूख्यमंञी महोदयांना निवेदन दिले होते व मागील काही दिवसापूर्वी आपले पालक मंञी ऊदय सामंत यांची भेट मंडळाच्या पदाधिकारी यांनी घेतली त्याची फलश्रृती निधी मंजूर होत आहे गावकरी व मूंबई मंडळ यांचे अभिनंदन. अशी माहिती स्थानिक रहिवासी चंद्रकांत साळुंके यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_