🛑 जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि – ०२:- सेवाजिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. २१ नोव्हेंबर २४ रोजी सिंधुदुर्गनगरीतआयोजित करण्यात येणार आहे , १५ ते २९ वयोगटातील सहभागी होणाऱ्यायुवक युवती नीऑनलाइन द्वारे अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे . युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यात सन २०२४- २५ या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचे वतीने आयोजित करण्यात येणार आहे.
युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करुन राज्याचा प्रातिनिधिक चमु राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येतो.
राष्ट्रीय युवा महोत्सव सन २०२४- २५ मध्ये संकल्पना आधारित बाबींसाठी “विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना” – “Innovation in Science and Technology” ही संकल्पना दिलेली आहे. . या संकल्पनेवर आधारित जिल्हा युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन २ ४ – २५ या वर्षातील जिल्हास्तर युवा महोत्सव दि. २१ नोव्हेंबर २४ रोजी स. ९.०० वाजता जिल्हा नियोजन समिती हॉल (नवीन) सिंधुदुर्गनगरी ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे आयोजन करण्यात येणार आहे. सदरील जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये खालीलप्रमाणे स्पर्धात्मक बाबींचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्हास्तर युवा महोत्सवाची नियमावली सोबत दिलेल्या गुगल लिंकवर देण्यात आलेली असून युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता नाव नोंदणी गुगल लिंक फॉर्ममध्ये भरण्यात याव्यात.
https://docs.google.com/forms/d/1WztBkNQLtCzFbJMa9Iw5N64Ym8HvIw8CSmkHxlD7w5s/edit
१. सांस्कृतिक – समुह लोकनृत्य , वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत ,
२. कौशल्य विकास – कथा लेखन, पोस्टर स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी ) फोटोग्राफी,
३. संकल्पना आधरित स्पर्धा – महाराष्ट्र राज्यासाठी १. तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर २. सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान युवा कृती – हस्तकला, वस्त्रोद्योग, ॲगो प्रोडक्ट
तसेच जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरीता जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल. युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली नाव नोंदणी स्पर्धापुर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे करावी. तसेच सहभागाबाबत गुगल लिंकवर दि. २० नव्हेबर२४पर्यंत भरण्यात यावे. जिल्ह्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालयातील व कृषी महाविद्यालय, इंजिनिअरींग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थोतील जास्तीत जास्त युवक – युवती / संघांनी,महिला मंडळ यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.विद्या शिरस यांनी केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

