कोकणरत्नागिरीराजकीयशासकीयसामाजिक

गोवळकोट पुनर्वसन समितीचा लढा निर्णायक मार्गावर; दलवाईंचा पाठिंबा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.१७: शहरातील गोवळकोट पुनर्वसन समितीचा लढा आता निर्णायक मार्गावर येऊन पोहचला आहे. दि. १२ ऑगस्ट २०११ च्या पत्राने पुनर्वसन कामावर स्टे आणणारे दस्तुरखुद्द हुसेन दलवाई यांनी आज बाधित कुटुंबियांच्या राहत्या घरची विदारक परिस्थिती पाहून व शासनाने २०१० मध्ये निश्चित केलेली जागाच योग्य असल्याची खात्री पटल्यामुळे त्यांनी या जनलढयाला आपला पाठींबा दर्शविला. १५ कुटुंबांचे पुनर्वसन कोयना प्रकल्पाच्या जगेतच होईल असे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांच्या आणि बाधित कुटुंबियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

चिपळूण दौऱ्यावर आलेल्या दलवाई यांनी गोवळकोट कदम बौद्धवाडीतील विहारामध्ये शनिवार काल दुपारी ३:३० वाजता समितीच्या पदाधिकाऱ्यांशी व ग्रामस्थांशी दीर्घ चर्चा केली. यावेळी त्यांच्याबरोबर मुस्लिम समाजाचे नेते लियाकत शहा उपस्थित होते. सुरवातीला अनिश कदम यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी समितीचे पदाधिकारी सुभाष जाधव यांनी ग्रामस्थ्यांच्या व्यथा मांडल्या. तुमच्या एका पत्रामुळे येथील कुटुंबे देशोधडीला लागल्याचे, तसेच त्यांची एक पिढी बरबाद झाल्याचे दलवाई यांच्या निदर्शनास आणून दिले. सुभाष जाधव यांनी दलवाई यांनी दि. १२ ऑगस्ट २०११ रोजी सरकारी यंत्रणेला  दिलेले, पुनर्वसन थांबविणारे ते पत्रच वाचून दाखविले. त्यामुळे दलवाई यांची पंचाईत झाली आणि त्यामुळे यांनी आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य करून, ते पत्र सत्यता नं पडताळता अनवधानाने पाठवले गेल्याचे दलवाई यांनी  सांगितले. पुनर्वसनाच्या या लढ्यामध्ये मी बाधित कुटुंबियांसोबत तसेच पुनर्वसन समिती सोबत असल्याचे सांगितले. २६ जानेवारीला २०२१ रोजी होणाऱ्या उपोषणाला त्यांनी पाठिंबा जाहीर केला. यावेळी समितीच्या वतीने उपाध्यक्ष सुरेश कदम, सचिव उदय जुवळे, निवृत्त सैनिक भीम मार्शल संतोष मोहिते, सदस्य प्रशांत पोतदार यांनी सडेतोडपणे व अभ्यासपूर्ण विचार मांडले. तसेच, पत्रकार बंधूनी या प्रश्नाला न्याय देण्यासाठी घेतलेल्या भूमिकेचे स्वागतही केले.

यानंतर हुसेन दलवाई यांनी गोवळकोट धक्का मैदानाशेजारील शासकीय मालकीची जागा स.नं. १२७ व १२७ (अ) या पूर्वी शासनाने निश्चित केलेल्या जागाचीही पाहणी केली आणि पुनर्वसनसाठी हीच जागा योग्य असल्याचे मान्य केले. या जागेतच पुनर्वसन करण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले.

त्यानंतर मंगळवार दि.१९ जानेवारी २०२१ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या बरोबर एक तातडीची बैठकही ठरविली. लवकरात लवकर याठिकाणी ग्रामस्थांसाठी चांगल्या दर्जाची घरे उभारली जावी व त्यांना संविधानाने सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आपली जुनी भूमिका बदलून शासनाने पूर्वी नीच्छित केलेल्या जागी पुनर्वसन व्हावे असे आश्वासन दिले आणि स्वतः जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची न्यायी भूमिका दलवाईंनी घेतल्यामुळे ग्रामस्थांनी दलवाई यांचे आभार मानले.

यावेळी समितीचे अध्यक्ष भगवान बुरटे, उपाध्यक्ष किरण बांद्रे, सुरेश कदम, सहसचिव  श्रीराम शिंदे, संतोष मोहीते, सचिन मोहिते, राजेश जाधव, उमेश सकपाळ, प्रशांत मोहिते, दीपक निवाते, विजय कदम, संदेश कदम, सिद्धार्थ कदम, अशोक कदम, राहुल कदम, अंगत कदम, उत्तम कदम, तरूण कदम, अविनाश कदम, अजित कदम, आनंद पवार, निलेश कदम, उमेश कदम, आनंद पवार, विश्वास कदम, प्रशांत पोतदार, अमोल कदम, प्रणित कदम इतर समिती सदस्य, सर्व ग्रामस्थ व महिलावर्ग उज्वला कदम, मंदा कदम, संगीता कदम, उत्तमी  कदम, निता कदम, अनुष्का कदम, विद्या कदम, उषा कदम, सुनंदा कदम, विशाखा कदम, प्रियांका कदम आदी उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!