कोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

श्री स्वामी समर्थ मठ ते बहादुरशेख नाका रस्ता कामाचा शानदार शुभारंभ..

▪️अनेकवर्षं प्रलंबित असलेले काम मार्गी लागल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त..

▪️सर्वपक्षीय नेत्यांची प्रमुख उपस्थिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.१७: येथील नगरपरिषदेच्या १४ व्या वित्त आयोग निधीतून होत असलेल्या श्री स्वामी समर्थ मठ ते बहाद्दूरशेख नाका रस्त्याच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामाचा शुभारंभ रविवारी सकाळी ११ वा. चिपळूण च्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.सुरेखाताई खेराडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिनभाई कदम, माजी नगराध्यक्ष सुचय रेडीज या प्रभागाचे स्थानिक नगरसेवक आरोग्य सभापती शशिकांत मोदी, अविनाश केळस्कर, सीमा रानडे, रसिका देवळेकर, फैरोजा मोडक, वैभव चव्हाण, विनायक औक, भिकुशेठ काणेकर, ओमप्रकाश मालू, अविनाश हरदारे, कुंदाताई खेडेकर आदी मान्यवर आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

मार्कंडी, कावीळतळी, बहाद्दूरशेख नाका येथील रहिवासी मंडळींची या रस्त्याकरीता पालिकेकडे वारंवार मागणी होत होती. रस्त्याची फारच दुरवस्था झाली होती. अखेर नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे आणि स्थानिक नगरसेवकांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळेच अखेर शासनाच्या १४ व्या वित्त आयोग मधून  सन २०२०-२१ अंतर्गत शहरातील मार्कंडी श्री स्वामी समर्थ मठ ते बहादूरशेख नाका रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाला अंदाजित रक्कम नुसार १ कोटी १९ लाख २३ हजार ९२२ रुपये निधी उपलब्ध झाला आहे.

या रस्त्याचे काम मार्गी लागल्यामुळे येथील नागरिकांनी नगराध्यक्षा आणि स्थानिक नगरसेवकांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाला शिवसेना गटनेते मागासवर्गीय समिती सभापती उमेश सकपाळ, बांधकाम  सभापती मनोज शिंदे, महिला बाल कल्याण सभापती सुमय्या फकीर, जेष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे, आशिष खातू, नगरसेवक विजय चितळे, परिमल भोसले, सफा गोठे, वर्षा जागुष्टे, स्वाती दांडेकर, भगवान बुरटे, संजीवनी शिगवण, नुपूर बाचीम, रश्मी गोखले, जेष्ठ शिवसैनिक राजू भागवत, संतोष मेहता, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगरसेवक महम्मद फकीर, विवेक रेळेकर, कांतीलाल पटेल, मंगेश पेंढाम्बकर, राणी महाडिक, दीपा देवळेकर, रामदास राणे, जगदीश वाघुळदे, विनोद कदम, संदीप चिपळूणकर, नगर अभियंता परेश पवार, ठेकेदार सुरेश चिपळूणकर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!