पंचम खेमराजमध्ये ५ रोजी महाआरोग्य शिबीर
*🛑पंचम खेमराजमध्ये ५ रोजी महाआरोग्य शिबीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०२:-* सावंतवाडीत ५ ऑक्टोबरला पंचम खेमराज कॉलेजात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात तपासणी करणाऱ्या रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर विविध योजनांतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. शिबिरात विविध रोगाचे १९ तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा ‘शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत उर्फ बाळराजे भोसले यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. युवराज लखमराजे भोसले, श्रद्धाराजे भोसले, संस्थेचे संचालक सतीश सावंत अॅड. श्यामराव सावंत, जयप्रकाश सावंत, प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, प्रा. डी. टी. देसाई आदी उपस्थित होते. सावंतवाडीत बेळगाव येथील प्रसिद्ध केएलई रुग्णालयाच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन केले आहे. केएलई रुग्णालयाचे देशभरात नाव आहे. या रुग्णालयात आता महाराष्ट्र शासनाच्या योजना रोगांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयाचा लाभ रुग्णांना होणार आहे. खेमसावंत बाळराजे भोसले यांनी
बेळगाव येथील केएलई रुग्णालयाचे डॉ. प्रभाकर कोरे यांच्याशी महिनाभरापूर्वी या संदर्भात चर्चा केली. कोरे यांनी कॉलेजतर्फे शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्याला अनुसरून हे शिबीर होत आहे. शिबिरात मेंदू रोग, डायबिटीस, दंतरोग, स्त्रीरोग, डोळ्यांचे विकार, त्वचा विकार, हाडाचे विकार, युरोलॉजी आणि नेपोलॉजी, मानसोपचार, नाक, घसा, कान आदी तपासण्या होणार आहेत. मोफत बीपी, ईसीजी, इको, ब्लड, शुगर चेक सुविधा येथे असणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन बाळराजे भोसले यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

