या लाडकीचा भरोसा नाही – नितीन गडकरी
या लाडकीचा भरोसा नाही – नितीन गडकरी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोडावर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आणली. मात्र आता या योजनेवर विरोधकांसोबतच भाजप नेत्यांनीही राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय. या योजनेवर दुसरे तिसरे कुणी नाही तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच निशाणा साधलाय. लाडकी बहीण योजनेमुळे इतर विभागांमधल्या अनुदानाला कात्री लागल्याचं विधान गडकरींनी केलंय. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढलीय.
लाडकीवरून गडकरींनी केलेल्या विधानामुळे विरोधकांच्या आरोपांना आणखीनच धार आलीय. सरकारमध्ये लाडकीवरून नेमकं काय सुरू आहे? हे गडकरींनाच माहित असेल. त्यामुळे त्यांनी सुप्रिया सुळेंना सरकारवर निशाणा साधलाय. तर राऊतांनीही या योजनेत गौडबंगाल असल्याचं हल्ला केलाय. राज्यावर ७ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था आणखी खोलात जाईल, अशी टीका विरोधी पक्ष वारंवार करत असताना गडकरींसारख्या बड्या नेत्यानं सरकारलाच घरचा आहेर दिल्यानं सरकारची अडचण झालीय. त्यामुळे लाडकीचा नकारात्मक नरेटीव्ह महायुती खोडून काढण्यात यशस्वी होणार का? आणि याचा निवडणुकीत किती फायदा होणार? हे निकालानंतरच स्पष्ट होणार.

