🛑 आंगणेवाडी वर एसटी महामंडळाचा अन्याय..
🛑 देवगड आंगणेवाडी एसटी अनियमित..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मसुरे, दि – ०१ पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या आदेशानंतर विभाग नियंत्रक श्री अभिजीत पाटील यांनी देवगड आंगणेवाडी मालवण व्हाया आचरे त्रिंबक मसुरे बांदीवडे आंगणेवडी मालवण ही गाडी सुरू केली . परंतु देवगड एसटी डेपो मॅनेजर यांनी सदर गाडी काही दिवसातच पुन्हा बंद केली. परंतु पुन्हा एकदा आंगणेवाडी विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन व प्रत्यक्ष भेट घेऊन सदरची एसटी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले असता सदरची एसटी विजयदुर्ग आंगणेवाडी अशी सुरू केली परंतु सद्यस्थितीत ही गाडी कधी येते कधी येत नाही हे कोणालाच कळत नाही. काही वेळेला ही एसटी दुसऱ्याच मार्गाने जाते. त्यामुळे प्रवासी,ग्रामस्थ , आंगणेवाडी येथील भराडी देवी भक्तांच्या भाविकांचे अतोनात हाल होत आहेत काही वेळा ही एसटी नियोजित बस थांबल्यावर ही थांबत नाही.
महाराष्ट्रामध्ये आंगणेवाडी येथे श्रीदेवी भराडी देवी मातेचे प्रसिद्ध असे मंदिर असून दरदिवशी हजारो भाविक या मंदिराला भेट देत असतात आणि म्हणूनच या एसटीची मागणी भराडी मातेच्या भक्तांमधून आणि ग्रामस्थांमधून होत होती. येथील प्रसिद्ध यात्रा उत्सवामध्ये एसटी महामंडळाला येथील ग्रामस्थ आणि मंडळ आपल्या जागा विना मोबदल्या उपलब्ध करून नेहमी सहकार्य करत असतात. परंतु देवगड एसटी आगर आणि संबंधित सर्व एसटी अधिकारी वर्गाच्या गलथान कारभारामुळे सदरची एसटी अनियमित तर कधी कधी येतच नसल्यामुळे आंगणेवाडी वरती हा एक प्रकारचा अन्याय असून सदर एसटी कायमस्वरूपी न केल्यास येथील ग्रामस्थ आंदोलन छेडणार असून याबाबत पुन्हा एकदा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधणार आहेत अशी माहिती आंगणेवाडी येथील ग्रामस्थ सिताराम उर्फ बाळा आंगणे यांनी दिली.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

