ग्रामपंचायतस्तरावर नल जलमित्रांची नियुक्ती करणार
*🛑ग्रामपंचायतस्तरावर नल जलमित्रांची नियुक्ती करणार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२६:-* जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता बहु कौशल्यावर आधारित जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी-प्लंबर, मेकॅनिकल फिटर, इलेक्ट्रीशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल जलमित्रांची नेमणूक प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणार आहे. ४३१ ग्रामपंचायतींसाठी किमान १ हजार २९३ बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक विनायक ठाकुर यांनी दिली. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना कार्यान्वित घरगुती नळ जोडणीद्वारे प्रती मानसी प्रती दिन ५५ लि. विहित गुणवत्तेसह दैनंदिन वापरासाठी कार्यान्वित नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी व योजना शाश्वत टिकविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती योग्य रितीने व्हावी, या उद्देशाने प्रति ग्रामपंचायत तीन नल जलमित्रांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी-प्लंबर, मेकॅनिकल फिटर, इलेक्ट्रोशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे प्रत्येक ट्रेडसाठी तीन या प्रमाणे प्रती ग्रामपंचायत नऊ उमेदवारांची नाम निर्देशने, संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड व फोटोसह ग्रामपंचायत स्तरावर संपर्क साधण्यात यावा. ग्रामपंचायतीमार्फत विहित नमुन्यात सादर केलेल्या शिफारस पत्रातील नऊ नामनिर्देशित व्यक्तींमधून राज्यस्तरावरूनं प्री- स्क्रीनिंग करूम ट्रेडनुसार तीन नाम निर्देशन अंतिम करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी निश्चित करण्यात आलेला कौशल्य संच पुढीलप्रमाणे आहे. गवंडी- प्लंबर, मेकॅनिकल फिटर, इलेक्ट्रीशियन पंप ऑपरेटर या तीन ट्रेडसाठी गावातील अनुभव असलेल्या व्यक्तीस प्राधान्य देण्यात येणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

