वाफोलीत भरदिवसा घरफोडी, दागिन्यांवर डल्ला
*🛑वाफोलीत भरदिवसा घरफोडी, दागिन्यांवर डल्ला*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-२६:-* वाफोली-अन्नपूर्णावाडी येथील अंकुश देसाई यांच्या घरात अज्ञात ‘चोरट्याने बुधवारी दिवसाढवळ्या चोरी केली. यात रोख रकमेसह किमती दागिने चोरट्याने लंपास केले. सदर चोरट्याने त्याच परिसरात आणखी तीन ठिकाणी घरफोड्या केल्या. मात्र, तेथे त्याच्या फारसे काही हाती लागले नाही. बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत चोरीबाबत बांदा पोलिसात फिर्याद दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा प्राप्त झालेला नाही. वाफोली अन्नपूर्णावाडी येथील अंकुश देसाई यांची मुलगी तेथीलच कारखान्यात कामाला गेली होती. त्यांची पत्नी वाडीतील एका घरात जेवण बनवण्यासाठी गेली होती. ही
संधी साधत चोरट्याने घराच्या दर्शनी भागाच्या खांबावर लपवून ठेवलेली चावी घेत दरवाजा उघडला. घरातील रोख रक्कम व किमती दागिने घेऊन अज्ञात चोरटा पसार झाला. दुपारी अंकुश देसाई यांच्या पत्नी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. याबाबतची माहिती बांदा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक विकास बडवे, उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे, हवालदार सीताकांत नाईक, ज्ञानदेव कापसे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अन्य तीन ठिकाणीही सदर चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हाती फारसे काही लागले नाही. याबाबत बांदा पोलिसात रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती. सदर चोरटा माहीतगार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सायंकाळी उशिरा ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_