संस्कृत दिनाचे औचित्य साधून व्ही.एन.नाबर बांदा विद्यालयात संस्कृतचे वर्ग सुरू
*🛑संस्कृत दिनाचे औचित्य साधून व्ही.एन.नाबर बांदा विद्यालयात संस्कृतचे वर्ग सुरू*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२४:-* बांदा येथील व्ही.एन.नाबर प्रशालेत संस्कृत दिनाच्या निमित्ताने संस्कृतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्कृत विषयात बी.ए.झालेले व साहित्य विशारद डिग्री असलेले श्री.नरहरी उपाध्ये सर व्यासपीठावर उपस्थित होते त्याचबरोबर संस्कृत शिक्षक श्री.तृषार कुडकेही उपस्थित होते तसेच बांदा गावचे उपसरपंच श्री.बाळू सावंत व पंचायत सदस्य श्री. शामसुंदर मांजरेकर आणि श्री.निलेश कदम यावेळी तिथे उपस्थित होते. वाय.पी.एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस.एस.पी.एम गोवाचे जनरल सेक्रेटरी श्री.त्रिविक्रम उपाध्ये सर आणि सेक्रेटरी श्री. बालेंद्र बी.सतरकर सर उपस्थित होते.
इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी मधूर असे स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वरसुमनांनी स्वागत केले.तद्नंतर मान्यवरांनी श्री देवी सरस्वतीच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण केला व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विशेष अतिथी म्हणून लाभलेले श्री.बाळू सावंत यांनी आपले विचार व्यक्त करताना, इंग्रजी माध्यमाची शाळा असूनसुद्धा,संस्कृत सारखा विषय इथे सुरू होत आहे यासारखी दुसरी अभिमानाची बाब नाही म्हणून त्यांनी सर्वप्रथम याबद्दल शाळेचे कौतुक व अभिनंदन केले.त्यानंतर संस्कृत शिक्षक श्री.तृषार कुडके यांनी आपल्या शाळेत
संस्कृत वर्ग सुरू करूया जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल याविषयीचे विचार शाळेतून त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांनी सर्वप्रथम शाळेची कौतुकाने पाठ थोपटली आणि हे संस्कृतचे वर्ग सुरू करण्याचे प्रयोजन व्यक्त केले.त्यानंतर उद्घाटक श्री.नरहरी उपाध्ये सरांनी संस्कृत विषयी आपले विचार व्यक्त करताना,ही सर्वात प्राचीन भाषा असून ही भाषा प्रसिद्ध व्याकरण तज्ञ पाणिनी यांनी प्रमाणित केली होती.ही भाषा हिंदू ,जैन,बौद्ध धर्मांच्या उपासनेची भाषा आहे असेही ते म्हणाले.या संस्कृत वर्गासाठी शाळेतील नव्हे तर इतर शाळांतील विद्यार्थी,पालक व इतर कोणीही ( वयाचे बंधन नाही )जे संस्कृत शिकण्यास इच्छुक असतील त्यांनी शाळेच्या शिक्षिका सौ. सुमित्रा सावंत ( ७५८८९३३४०५ ) यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका स्नेहा सुनील गावडे तर आभार सौ.दिक्षा नाईक यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

