वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांचा उद्यापासून ४८ तासाचा संप
*🛑वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांचा उद्यापासून ४८ तासाचा संप*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२४:-* वीज कर्मचारी, अभियंता व अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता व अधिकारी कृती समितीने २५ व २६ सप्टेंबरला ४८ तासांचा संप पुकारला आहे. राज्यातील सुमारे एक लाख कर्मचारी व अधिकारी या संपात सहभागी होणार असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील वीज कर्मचारी व अधिकारी सहभागी होतील, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली. सर्व वीज कर्मचारी-अभियंता व अधिकाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, ३ कोटींवर वीज ग्राहकांना जिवाची जोखीम पत्करून अखंडित वीज निर्मिती, पारेषण व वितरणाचे काम एक लाख कर्मचारी, अभियंता व अधिकारी महाराष्ट्रात करत आहेत. सीमेवर अतिरेक्यांशी लढतांना सीमा सुरक्षा करतांना ज्या संख्येने जवानांचा मृत्यू होतो, त्यापेक्षा जास्त कर्मचारी दरवर्षी महाराष्ट्राच्या वीज उद्योगात मरण पावतात. अशा उद्योगातील कर्मचाऱ्यांना पुरोगामी महाराष्ट्रात पेन्शन योजना लागू नाही. ती पेन्शन लागू करावी.मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेट
सबकमिटीने वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याचा निर्णय २००९ मध्ये तिन्ही वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाला कळविला. ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांनी मुंबई उच्च न्यायालयात राज्य शासनाने वीज कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेला मान्यता दिल्याचे शपथपत्र दाखल केले. त्यानंतरही पेन्शन योजनेवर अंमलबजावणी झालेली नाही, ती लागू करावी. १६ जलविद्युत केंद्राच्या खासगीकरणाचा निर्णय रद्द करावा. अशाप्रकारे वीज कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या मागण्या असून या मागण्या सातत्याने मांडूनही दुर्लक्ष केला जात नसल्याने शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व वीज कर्मचारी, अभियंता व अधिकारी २५ व २६ सप्टेंबरला ४८ तासांचा संप करणार आहेत. या संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज कर्मचारी सहभागी होणार असून हा संप यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन वीज कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष मोहन शर्मा, वीज कामगार महासंघाचे महामंत्री अरुण पिवळ, कृष्णा भोवर, आर. टी. देवकांत, संतोष खुंकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_