आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

🛑 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा सुरू ..

🛑 भाजपा चिपळूण तर्फे लिलाबाई आधार आश्रमात अकरा हजार रूपये देणगी ..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण , दि -१७:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात यावा असे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचना दिलेल्या आहेत. यानुसार भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी एकत्र येऊन लिलाबाई आधार आश्रम, मौजे गाणे, ता. चिपळूण या वृध्दाश्रमात अकरा हजार रूपये देणगी स्वरुपात देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.

 

यावेळी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, जिल्हा चिटणीस विनोद भुरण, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सौ. स्नेहा मेस्त्री, तालुका उपाध्यक्ष संदिप सुखदरे, ओंकार बापट , तालुका सरचिटणीस सौ. निलिमा पाटेकर, तालुका चिटणीस जितेंद्र खेतले, खेर्डी माजी सरपंच सुनील मेस्त्री, बूथ प्रमुख गणेश नलावडे, नवीन घोलप, दर्शन चव्हाण, काशिनाथ ईंगावले, तसेच आश्रमातील राम देसाई, व वृद्धाश्रमातील वयोवृद्ध महिला पुरुष उपस्थित होते.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.या सेवा पंधरवड्यात रक्तदान शिबीर, अनुसूचित जाती/ जमातींचे वास्तव्य असलेल्या वस्त्यांमध्ये मोफत आरोग्य शिबीर घेणे, युवा वर्गासाठी निबंध, वकृत्व , चित्रकला स्पर्धा, पॅरिस येथील पॅरा – ऑलिंपिक स्पर्धेत आपल्या जिल्ह्यातील सहभागी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करणे, दिव्यांग खेळाडूंचा सन्मान करणे, पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त प्रत्येक बूथ वरती प्रतिमा पूजन व माल्यार्पण करणे, एक पेड माॅं के नाम ( वृक्षारोपण कार्यक्रम ) करणे, महापुरुषांच्या पुतळा परिसराची स्वच्छता करणे इत्यादी कार्यक्रम या सेवा पंधरवड्यात करण्यात येणार आहेत, असे भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी सांगितले.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!