बेकायदा शेतजमीन व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करा!
*🛑बेकायदा शेतजमीन व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करा!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१७:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करत विविध कंपन्या स्थापन करून अनेकांनी पर्यटनाच्या नावाखाली येथील शेतजमिनी कवडीमोलाने खरेदी केल्या आहेत. हा खरेदी-विक्री व्यवहार वाणिज्य वापरासाठी म्हणून दाखवून प्रत्यक्षात मात्र या जमिनींचा वापर वेगळ्याच कारणासाठी होत आहे. ही एक प्रकारची शासनाची व येथील शेतकऱ्यांची फसवणूकच आहे. त्यामुळे भूषण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा कथित कंपन्यांचा शोध घेऊन जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील भ्रष्टाचार उघड करावा, अशी मागणी येथील सामाजिक र्कायकर्ते भूषण आंगचेकर यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित असल्याने देशभरातील मोठमोठ्या व्यावसायिकांचे लक्ष येथील जमिनींवर आहे. २००० सालापासून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने कंपनीच्या नावाखाली वाणिज्य वापरासाठी म्हणून खरेदी करण्यात
आल्या आहेत. मात्र, खरेदी केलेल्या जमिनींचा वापर अद्यापही वाणिज्य वापरासाठी होताना दिसत नाही. अनेक जमिनी पर्यटन प्रकल्पाच्या नावाखाली खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र, तेथे अद्याप कोणत्याही प्रकारचे प्रकल्प उभे झालेले नाहीत. परिणामी, जिल्हयाचा पर्यटन विकास रखडला आहे. या बोगस कंपन्यांचा पर्यटन नावाखाली प्रकल्पाच्या जमिनी विकत घेऊन कालांतराने चढ्या दराने विकण्याचा आंगचेकर डाव आहे. अनेकांनी या जमिनी कवडीमोलाने घेऊन चढ्या दराने इतरांना विकून रग्गड पैसाही कमविला आहे. शासनाची ही एक प्रकारे फसवणूकच असून अशा बोगस कंपन्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. कंपनी स्थापन केल्याचे कागदोपत्री दाखवून चाललेला हा काळा बाजार थांबवून शासनाने येथील भूमीपुत्रांना दिलासा द्यावा. अशा व्यवहारात गुंतलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी आंगचेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
