जन्मगावची आवड असल्याने चालून आलेल्या संद्या सोडून जन्मगावीच सेवा देणारे निष्णात डॉक्टर अजय स्वार

*🛑 जन्मगावची आवड असल्याने चालून आलेल्या संद्या सोडून जन्मगावीच सेवा देणारे निष्णात डॉक्टर अजय स्वार*

*🛑 वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जिवनकार्यावर टाकलेला प्रकाशझोत..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१६:-* श्री देव पाटेकर,व रयत पिलगीचा रक्षण कर्ता ३६५ खेड्यांचा चाळा श्री देव उपरलकर यांच्या इश्वरी वरदहस्ताने पावन झालेल्या सुंदरवाडी व आताची सावंतवाडी या सुजलाम सुफलाम शहरात गेली ३५ वर्षे ज्या व्यक्तीचे नाव आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे सावंतवाडीतील प्रतिथयश डॉ अजय स्वार,माझे व त्यांचे गेल्या ३५ वर्षाचे ऋणानुबंध आहेत,दहावीत असताना रुग्ण म्हणून त्यांच्याकडे गेलो व त्यांच्या कुटु़बातील सदस्य झालो,आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या डाॅ मीत्राने लिहेलेला हा लेख मी प्रसिद्ध करीत आहे,माझ्या एका जवळच्या व्यक्ती बद्दल येवढ्या आपुलकीने कोणीतरी लिहीतो तर आपणही त्याला हात भार लावून आमच्या डाॅ यशोगाथा वाचकांपर्यंत पोहचवावी हाच उद्देश…
सर्व डॉक्टर लोकांना हवेहवेसे वाटणारे हार्ट सर्जन हे अतिउच्च क्षेत्र डॉ अजय स्वार यांनी नाकारले कारण त्यांना आपल्या गावी परत आपल्या जनतेची सेवा करायची होती. सावंतवाडी मधील पहिले खाजगी रुग्णालय, पहिली सोनोग्राफी मशीन, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले अत्याधुनिक निदान केंद्र उभारण्यात मोठा वाटा असे कर्तृत्व असलेल्या निष्णात सर्जन डॉ अजय स्वार ..
जन्मगाव बांदा, प्राथमिक शिक्षण व शालेय शिक्षण बांदा येथेच. कॉलेज पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी.चौथीमध्ये मिडल स्कूल मेरिट स्कॉलरशिप. सातवी मध्ये हायस्कूल मेरीट स्कॉलरशिप व अकरावी मध्ये नॅशनल मेरिट स्कॉलरशिप त्यामुळे एमबीबीएस पर्यंतच्या शिक्षणामध्ये त्यांना आर्थिक अडचण आली नाही.गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथून एमबीबीएस व एम एस.केले.कार्डिओ थोरॅसिक सर्जरी यामध्ये सुपर स्पेशलिझेशन मिळाले होते. परंतु गावाकडे काम करायचे असल्यामुळे सावंतवाडीला पोस्टिंग घेतली .लहानपणी बांदा येथे डॉक्टर भाई खानोलकर (डॉक्टर अरविंद
खानोलकर यांचे वडील) यांच्या दवाखान्यात ते बराच वेळ जायचे.
त्यांच्याकडे पेशंटची बरीच गर्दी असायची. त्यांची पेशंट बरोबर
बोलायची पद्धत व पेशंट त्यांना देत असलेला मान हे सर्व पाहून डॉक्टर होण्याची आवड निर्माण झाली व आई-वडिलांनी त्याला मनस्वी पाठिंबा दिला व त्यामुळेच ते डॉक्टर होऊ शकले. यशस्वी डॉक्टर होण्यामध्ये आई वडिलांचा, भावंडांचा, पत्नी डॉ अमृता व हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग यांचा खूपच मोठा वाटा आहे.
1984 ते 1989 या काळात सर्जन म्हणून त्या वेळच्या सिव्हिल हॉस्पिटल सावंतवाडी येथे सेवा दिली.त्यावेळी सावंतवाडीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये अत्यंत तुटपुंज्या सोयी व साधने उपलब्ध होत. भूलतज्ञ तर नव्हताच. अशावेळी जनरल सर्जरी, इ एन टी, ऑर्थोपेडिक, प्लास्टिक सर्जरी, गायनॅकॉलॉजी या क्षेत्रातील हजारो ऑपरेशन्स स्वतः भूल देऊन केली.
1988 – 89 मध्ये डॉक्टर सेलमोकर हे भुलतज्ञ जॉईन झाले व त्यामुळे बऱ्याच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करता आल्या .1990 मध्ये स्वतःचे श्री साई हॉस्पिटल हे 25 बेडचे सर्जिकल मॅटर्निटी सावंतवाडीतील पहिले प्रायव्हेट हॉस्पिटल सुरू केले.
पत्नी डॉक्टर अमृता यांनी राणी जानकीबाई सुतीकागृह येथे काम केलेले असल्यामुळे प्रसूती विभागाची सर्व जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. सांभाळली. 1990 मध्ये सुद्धा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एंडोस्कॉपी, प्रोस्टेटचे दुर्बिणी द्वारा ऑपरेशन वगैरे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत्या.
अल्ट्रा सोनोग्राफी 1992 यावर्षी सावंतवाडी तालुक्यातील पहिले सोनोग्राफी मशीन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. डॉक्टर अमृता यांनी बऱ्याच सोनोग्राफी कॉन्फरन्स अटेंड केल्या तसेच डॉक्टर संजय सरदेसाई मेडिकल कॉलेज गोवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोनोग्राफीची कला आत्मसात करून घेतली व त्याचा फायदा बऱ्याच रुग्णांना झाला. त्याकाळी कुडाळ वेंगुर्ला तालुक्यातही सोनोग्राफी मशीन नव्हते.हे सर्व चालू असतानाच कदाचित अतिकामामुळे 12 मे 2002 रोजी त्यांना मेंदूत रक्तस्त्राव, सेरेब्रल हिमरेज झाला व तीन महिने ते अंथरुणाला खिळून होते.त्याच्या मेंदूतील रक्तस्त्राव या आजारानंतर पत्नी डॉक्टर अमृता यांनी ज्या तऱ्हेने त्यांना धीर दिला व ते पुन्हा कार्यरत होईपर्यंत ज्या कार्यक्षमपणे हॉस्पिटल चालवले ते ते कधीही विसरू शकत नाही.
सर्जरीबद्दल असलेली आवड व जिद्द व रुग्णांच्या आशीर्वाद याच्या जोरावर 15 ऑगस्ट रोजी पुन्हा प्रॅक्टिस सुरू केली. 2004 मध्ये पूर्ण हॉस्पिटलचे नूतनीकरण केले
वर्ष 2008 त्यांच्या मनात एक कल्पना आली की जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी एक रेडिओ डायग्नोस्टिक निदान सेंटर असाव जेणेकरून रुग्णांना धावपळ करत कोल्हापूर गोवा बेळगाव येथे जावे न लागता रोगनिदान लवकरात लवकर होऊ शकेल. डॉक्टर नंदन सामंत, डॉक्टर विवेक रेडकर यांना ही कल्पना आवडली व त्यातूनच 2009 साली सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर व नंतर 2019 यावर्षी सिंधुदुर्ग रेडिओ डायग्नोस्टिक सेंटर सुरू झाले. व याचा फायदा सिंधुदुर्गातील हजारो रुग्णांना कसा झाला हे सर्वश्रुत आहे.
सावंतवाडी इथे लेप्रोस्कोपिक सर्जरी, एनडोस्कॉपी प्रोसिजर, सर्व प्रकारच्या युरो सर्जरी हे सर्व सुरू करण्यात आले. सर्व अत्याधुनिक सेवा उपलब्ध केल्या.मोठा मुलगा अमेय हा डी एन बी ऑर्थोपेडिक मध्ये भारतात पहिला येऊन त्याला गोल्ड मेडल मिळाले तसेच त्याने जॉईंट रिप्लेसमेंट व आर्थोस्कॉपी मध्ये फेलो शिप केली. गेली पाच वर्ष तो गोवा व सावंतवाडी इथे ऑपरेशन्स करत आहे. त्यामुळे एक परिपूर्ण असे ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स असावे असे मनात आले व लगेचच ते सत्यात उतरवले. लॅमिनर फ्लो सह मॉड्युलर ऑपरेशन थिएटर २०’by २०’, सर्जिकल व्हेंटिलेटर सह सर्जिकल आयसीयू हे चालू झाले आहे.
आता साई हॉस्पिटलमध्ये एक सेप्टिक व दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स आहेत.2009 सालापासून काही अपरिहार्य कारणामुळे प्रसूती विभाग बंद केला होता. गेल्या वर्षी डॉक्टर दुर्भाटकर सर निवृत्त झाल्यानंतर डॉ स्वार सर यांच्या सांगण्यावरून त्यांनी डॉ स्वार हॉस्पिटल जॉईन केले. त्यामुळे सर्व सोईनी युक्त डिलिव्हरी रूम, वायरलेस एन एस टी मॉनिटर, अत्याधुनिक वार्मर व फोटो थेरपी युनिट हे सर्व करण्यात आले.
धाकटा मुलगा अनिश व त्यांच्या दोन्ही सुना ह्या डॉक्टर आहेत व
आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करत आहेत.1987 साली आय एम ए सावंतवाडी वेंगुर्ला कुडाळ शिरोडा अशी ब्रांच त्यांच्या पुढाकारांना स्थापन करण्यात आली. ते सेक्रेटरी होते, नंतर पाच वर्ष अध्यक्ष झाले. या सात वर्षाच्या काळात सिंधुदुर्गच्या सर्व डॉक्टरांसाठी अनेक सीएमइ व चार एक दिवशीय सेमिनार घेतले.समाजकार्याची आवड असल्यामुळे रोटरीच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपयोगी कामे केली. चार शाळांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, गुटखा विरोधी आंदोलन, एड्स वर जनजागृती इ. सावंतवाडी रोटरी क्लबच्या सिल्वर जुबली मध्ये ते अध्यक्ष होते. प्रेसिडेंट सायटेशन अवॉर्ड, enviromental झोनल अवॉर्ड त्यांना मिळाले आहे.स्नेह नागरी सहकारी बँकेचे ते गेली 25 वर्ष संचालक आहेत.कुठलिही प्रसिद्धी न करता गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, गरीब जनतेला धान्य वाटप करणे, वृद्धाश्रमाला मदत करणे ही कामे ते करतात.त्यांना शेतीची आवड आहे. सोनुर्ली व माणगाव येथे बागायती आहे. दर रविवारी साधारण ५ ते ६ तास ते शेतीत रमतात.सावंतवाडी मेडिकल असोसिएशन तर्फे उभयतांना डिसेंबर 2023 मध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.आज वयाच्या ७० व्या वर्षात प्रवेश करताना ते पूर्ण समाधानी आहेत.डाॅ अजय स्वार यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा सर तूम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार, माझी कुलदेवता आई तुळजाभवानी ने तुम्हाला उदंड निरोगी दिर्घ आयुष्य देऊन, जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, तुमचे व तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करावे, तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा परीपूर्ण कराव्यात, जारन, तारन, मारन, संमोहन, वशीकरण, भुत, पिशाच्च, बाधा, यापासून तुमचे व तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करावे हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!